मराठी सिनेसृष्टीतील बहुआयामी अभिनेता म्हणून सुव्रत जोशीला ओळखले जाते. त्याने आतापर्यंत अनेक नाटक, मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. सुव्रतची महत्वपूर्ण भूमिका असलेलं ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे नाटक गेल्या अनेक वर्षांपासून रंगभूमीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण आता लवकरच हे नाटक प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याच पार्श्वभूमीवर सुव्रतने एक पोस्ट शेअर केली आहे.

सुव्रत नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. नुकतंच त्याने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. सुव्रत जोशीची प्रमुख भूमिका असलेले ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाच्या शेवटचे काही निश्चित झालेले प्रयोगाबद्दल माहिती दिली आहे. त्याबरोबर त्याने काही फोटो शेअर करत पोस्टही लिहिली आहे.
आणखी वाचा : “तुमच्या साक्षीने वचन देतो की आता यापुढे…” केदार शिंदेंची पत्नीसाठी खास पोस्ट

HDFC Life Insurance Company appoints Keki Mistry
केकी मिस्त्री एचडीएफसी लाइफचे नवे अध्यक्ष; एचडीएफसी लाइफची धुरा केकी मिस्त्रींकडे
Job Opportunity UPSC Exams career
नोकरीची संधी: यूपीएससीच्या परीक्षा
Amit Kalyani Reappointed as Vice Chairman and MD of Bharat Forge
भारत फोर्जच्या उपाध्यक्षपदी अमित कल्याणींची पुनर्नियुक्ती
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?

सुव्रत जोशीची फेसबुक पोस्ट

“२०१६ साली सखी,अमेय आणि मी एकत्र येऊन “कलाकारखाना” आणि “अमर फोटो स्टुडिओ” चे बीज पेरले. हेतू होता मराठी व्यावसायिक रंगभूमीच्या मुख्य प्रवाहात आपल्याला हवा तसा कलात्मक अनुभव देणारी नाटके निर्माण करणे. त्या प्रवाहाचा विस्तार आपल्या पध्दतीने, आपल्या कुवतीनुसार थोडा वाढवणे,त्याला नवे वळण देणे,किंवा नवनवे कालवे काढणे! त्यामुळे नवा,तरुण प्रेक्षकवर्ग कदाचीत रंगभूमीकडे पाय वळवेल आणि “मराठी नाटक” नावाच्या या गोड नदीचे पाणी चाखायची चटक त्याच्याही जिभेला लागेल.

“अमर फोटो स्टुडिओ” चे बीज आम्ही रोवले पण मनस्विनी या तरुण, अस्सल प्रतिभावान लेखिकेच्या लेखणीचे खत त्याला मिळाले. निपुण धर्माधिकारी हा बारा रंगभूमींचे पाणी प्यायलेला दिग्दर्शक याला आवश्यक असलेला कल्पनाशक्तीचा ओलावा घेऊन आला. बीजाचे रोप झाले पण त्याचे झाड व्हायचे तर या नाजूक अवस्थेत सावली पुरवणारा भक्कम आधारवड हवा होता त्यासाठी सुनील बर्वे दादा हा त्याच्या सुबक आणि सुपीक व्यक्तिमत्वासहित या रोपावर स्वतःची उंच सावली धरून,भक्कम पाय रोवून शेजारी उभा राहिला. पूजा ठोंबरे आणि सिद्धेश पूरकर या तयारीच्या कलाकारांनी त्यांचा वेळ आणि ऊर्जा देवून याच्या रंगात आणि गंधामध्ये वैविध्य आणले. पुढे पर्ण पेठे आणि साईनाथ गनुवाड हे तयारीचे कलाकार असे काही मिसळून गेले की आधीच्या फांद्या गेल्या तरी वृक्ष नव्याने डवरला.

आणि मग मराठी नाट्य रसिकांनी या रोपाला प्रेमाची उब दिली, टाळ्यांचा – हशांचा सूर्यप्रकाश देऊ केला आणि योग्य प्रमाणात कौतुकाची वर्षा देखील केली. हे रोप खरोखरच चढत चढत त्याचा वृक्ष झाला आणि त्याला बहर आला. याखाली जमून गेली काही वर्षे प्रेक्षकांनी आनंदफुले वेचली. कित्येक लोक पुन्हा पुन्हा याच्या सावलीत येऊन आयुष्यातील ताण विसरून, विसावून गेले. तरुण लोक याच्या फांद्यावर पुन्हा पुन्हा येऊन, बागडून – खिदळून गेले. समीक्षक आणि पुरस्कार यांनी या वृक्षाला कुंपण दिले. ही फळे खाऊन आम्हीही तृप्त झालो.

आता हा गंध मनात ठेवून…त्याचा रसरशीतपणा आतमध्ये साठवून “अमर फोटो स्टुडिओ” या कल्पवृक्षाला आम्ही निवृत्ती देत आहोत. अनेकदा असे कलेचे बहरलेले वृक्ष, ऋतू संपून जातो तरी बळजबरीने तगवून ठेवले जातात… केवळ हव्यासापोटी. आतून बाहेरून ते वठून जातात, निष्पर्ण होतात. त्यामुळे डवरलेल्या अवस्थेत त्याचा निरोप घेणे इष्ट.

बहर असताना निरोप दिला तर गोष्टी मरत नाहीत तर त्या “अमर” होतात..तुम्ही सगळे एकदा शेवटचे याचा बहर झेलायला या… अगत्याचे निमंत्रण आहे., असे सुव्रत जोशीने म्हटले आहे.

आणखी वाचा : “आता वेळ आलीए पूर्णविराम देण्याची…” सुव्रत जोशीच्या ‘त्या’ पोस्टमुळे चाहते निराश

दरम्यान अमर फोटो स्टुडिओ या नाटकात अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, सिद्धेश पुरकर, पूजा ठोंबरे हे कलाकार होते. जानेवारी २०२३ मध्ये हे नाटक प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याची ही पोस्ट वाचून त्याचे चाहते निराश झाले आहे. या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करत ते दुःख व्यक्त करत आहेत.