निर्माता आनंद पंडित आणि अभिनेता पुष्कर जोग यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘व्हिक्टोरिया’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी हा या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या कलाकारांचा फर्स्टलूक समोर आला होता. नुकतंच या चित्रपटाच्या शूटींग संपले आहे. विराजस कुलकर्णीने याबाबतची पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराजस कुलकर्णी हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने एक फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटाच्या शूटींगबद्दल सांगितले आहे. ही पोस्ट शेअर करताना त्याला त्याने हटके कॅप्शन दिले आहे.

“व्हिक्टोरिया चित्रपटाचे शूटींग संपले. थंडी, पाऊस आणि रक्ताच्या धारांमधून आमचा पहिला हॉरर चित्रपट, तुमच्यापर्यंत पोहोचायला एक पाऊल पुढे आला आहे!” असे कॅप्शन विराजस कुलकर्णीने दिले आहे.

‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटात अभिनेता पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातून हीरा सोहल ही अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. तर जीत अशोक आणि अभिनेता विराजस कुलकर्णी हे दिग्दर्शनात पदार्पण या चित्रपटामधून करत आहेत.

“हम आपके है कौन? या चित्रपटामुळे मी…”, रेणुका शहाणे रमल्या जुन्या आठवणीत

‘व्हिक्टोरिया’ चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद ओमकार गोखले, जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. वैशल शाह हे सह निर्माता आहेत. गेल्यावर्षी या चित्रपटाच्या मुहूर्त संपन्न झाला होता. या बिग बजेट चित्रपटाची शूटिंग स्कॉटलंड येथे झाले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor virajas kulkarni share instagram post about victoria movie shooting end nrp
First published on: 11-03-2022 at 11:47 IST