राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफीसवर घसघशीत कमाई करत आहे. अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची आणि रणबीर कपूरच्या अभिनयाची प्रेक्षक- समीक्षकांकडून प्रशंसा होत आहे. तर दुसरीकडे अभिनेते- दिग्दर्शक योगेश सोमण यांनी ‘संजू’वर जोरदार टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमण यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि त्यामध्ये चित्रपटाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी संजय दत्तवरही टीका केली असून त्याचा उल्लेख थेट देशद्रोही, व्यसनाधीन आणि हरामखोर या शब्दांत केला आहे. दोन- तीन महिन्यांनंतर हा चित्रपट जेव्हा टेलिव्हिजनवर येईल तेव्हा ‘संजू’ नावाचं आक्रमण तुमच्या घरात घुसणार आहे, असं ते म्हणाले.

Sanju box office collection Day 3: तीन दिवसांत ‘संजू’ने पार केला १०० कोटींचा आकडा

‘तुमच्या मुलांना तुम्ही ‘संजू’ हा चित्रपट बघण्यापासून रोखू शकत नाही. पण त्यांना दुसरी बाजू तुम्ही नक्की दाखवू शकता. संजयच्या देशद्रोही कारवायांपासून ते पोलिसांना दिलेल्या मुलाखतींपर्यंत ज्या ज्या गोष्टी सोशल मीडियावर उपलब्ध आहेत, त्यासुद्धा तुमच्या मुलांना दाखवा. त्यांना दोन्ही बाजू कळायला हव्यात. पण संजय दत्तसारख्या व्यक्तिमत्त्वाची स्तुतिसुमनं गाऊ नका,’ असं ते या व्हिडिओत म्हणत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor writer yogesh soman criticised sanju and sanjay dutt calls him anti national
First published on: 02-07-2018 at 17:33 IST