सोशल मीडियावर बिनधास्तपणे व्यक्त होणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. एखादा सामाजिक विषय असो किंवा खासगी आयुष्यामधील एखादा प्रसंग असो हेमांगी याबाबत अगदी खुलेपणाने बोलताना दिसते. सोशल मीडियावर कायमच सक्रिय असणारी ही अभिनेत्री फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर ती आपल्या कामाबाबतदेखील माहिती चाहत्यांपर्यंत पोहचवत असते. नुकतीच तिने आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती पोस्ट केली आहे.
हेमांगी आता आपल्याला एका नव्या रूपात दिसणार आहे. चित्रपट वेब सीरिजनंतर आता ती नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. थँक्स डियर असं नाटकाचं नाव असून मराठीतील हरहुन्नरी कलाकार निखिल रत्नपारखी याने नाटकाचे लेखन दिग्दर्शन केलं आहे. तसेच तो या नाटकात अभिनयदेखील करत आहे.तिने पोस्टमध्ये लिहलं आहे की, “सुप्रभात नाट्यदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत….” असा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कलेच्या मूल्यमापनाआड राजकीय विचारसरणी नको – परेश रावल
हेमांगीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत तसेच मराठी कलाकारांनी तिचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत. हेमांगीने आजवर विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. फु बाई फुसारख्या विनोदी कार्यक्रमात तिने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. तिचं हे नाटक पाहण्यासाठी चाहतेदेखील उत्सुक आहेत.
दिग्दर्शक रवी जाधव यांच्या आगामी ‘ताली’ या वेबसीरिजमध्ये ती काम करत आहे. या वेबसीरिजमध्ये सुश्मिता सेन मुख्य भूमिकेत आहे. हेमांगी नुकतीच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात झळकली होती.