अभिनेत्री मानसी नाईक ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या वैवाहिक जीवनात वादळ आलं आहे. ती लवकरच पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार आहे. मानसीने घटस्फोटासाठी अर्जही दिला असून तिने स्वत: याबद्दलची माहिती दिली होती. त्यानंतर तिने प्रदीप खरेरावर अनेक खळबळजनक आरोप केले. त्यातच आता प्रदीपने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

प्रदीप खरेरा हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. गेल्या काही दिवसांपासून प्रदीप हा इन्स्टाग्रामवर विविध स्टोरी शेअर करताना दिसत आहे. काही मिनिटांपूर्वी प्रदीपने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो ऊंटावरुन सफारी करताना दिसत आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : “एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण

या व्हिडीओला कॅप्शन देताना तो म्हणाला,”मी खरा आहे कारण मला शत्रू असण्याची भीती वाटत नाही.” त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

दरम्यान प्रदीपने कालही इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने “आपण जे बघतो त्यावर कायमच विश्वास ठेवू नका. ते सर्व खरं असतं असं नाही. कारण मीठही कधी कधी साखरेप्रमाणे असल्याचा भास होतो”, असे म्हटले होते. त्याच्या या पोस्टवरुन अप्रत्यक्षरित्या मानसीच्या आरोपांना उत्तर दिले आहे.

आणखी वाचा : “त्यांनी मित्राचा बुरखा पांघरला आणि…” घटस्फोटाच्या चर्चांवर मानसी नाईकने पहिल्यांदाच सोडलं मौन

दरम्यान मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. पण त्यानंतर त्या दोघांनीही इन्स्टाग्रामवरून एकमेकांबरोबरचे फोटो डिलीट केले होते. त्यामुळे दोघांच्याही नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मानसी नाईकने माझ्या घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खऱ्या आहेत, अशी कबुली दिली होती. मी खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दुःखी आहे.” असे तिने त्यात म्हटले होते.