Meera Vasudevan Divorce : एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठी बातमी शेअर केली आहे. तिचा तिसरा संसार मोडला आहे. तिसरं लग्न तिने दीड वर्षांपूर्वी केलं होतं. पण ऑगस्ट २०२५ मध्ये तिचा घटस्फोट झाला आणि आता ती सिंगल आहे, असं तिने पोस्ट करून जाहीर केलं आहे. या अभिनेत्रीचं नाव मीरा वासुदेवन आहे.
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री मीरा वासुदेवन हिचा तिसऱ्यांदा घटस्फोट झाला. मीरा वासुदेवनने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आणि लिहिलं की तिचा कायदेशिररित्या घटस्फोट झाला आहे आणि ती ऑगस्ट २०२५ पासून सिंगल आहे. तिने मे २०२४ मध्ये सिनेमॅटोग्राफर विपिन पुथियानकम याच्याशी लग्न केलं होतं.
मीराने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांसह ही बातमी शेअर केली. ‘मी, अभिनेत्री मीरा वासुदेवन,अधिकृतपणे जाहीर करते की मी आता ऑगस्ट २०२५ पासून सिंगल आहे. मी माझ्या आयुष्यातील सर्वात अद्भुत आणि शांत टप्प्यात आहे,’ असं मीराने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
पाहा पोस्ट –
मीरा व विपिन काही काही महिन्यांपूर्वी वेगळे झाले, पण तिने आता अधिकृत पोस्ट करून त्याबद्दल सांगितलं. अभिनेत्री मीरा वासुदेवन आणि सिनेमॅटोग्राफर विपिन यांचे लग्न गेल्या वर्षी मे महिन्यात कोइम्बतूर इथे झाले होते. या जोडप्याची पहिली भेट कुडुम्बविलाक्कू या मालिकेच्या सेटवर झाली होती असं म्हटलं जातं. विपिनने अनेक टेलिव्हिजन मालिकांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले आहे आणि कुडुम्बविलाक्कू त्यापैकी एक आहे. या मालिकेत मीराने काम केलं होतं.
मीराने विपीनबरोबरचे तिचे सगळे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून हटवले आहेत. तिने तिचे लग्नाचे फोटोही डिलीट केले आहे. मीराचं हे तिसरं लग्न होतं. तिचं पहिलं लग्न २००५ मध्ये विशाल कुमारशी झालं होतं. त्यांचा २०१० साली घटस्फोट झाला. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच २०१२ मध्ये मीराने मल्याळम अभिनेता जॉन कोकेनशी लग्न केलं. या लग्नापासून त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव अरिहा आहे. या जोडप्याचा चार वर्षांनी म्हणजेच २०१६ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर २०२४ मध्ये मीराने तिसरं लग्न केलं होतं. पण हे लग्न अवघ्या वर्षभरात मोडलं.
मीरा वासुदेवनला फिल्म व टेलिव्हिजन इंडस्ट्रीत नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली. मीरा वासुदेवने मोहनलालबरोबर थनमाथरामध्ये काम करून मल्याळम इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. यानंतर तिने ओरुवन, एकांतम, काक्की आणि पचामरथनलिल सारखे इतर अनेक चित्रपट केले. नंतर दूरदर्शन मालिकांमध्ये तिने काम केलं. पुढे तिने टीव्ही मालिका केल्या. देवी, पेन आणि कुडुंबविलक्कू यांसारख्या शोमध्ये तिने काम केलं.
