दूरच्या पल्ल्यामध्ये रेल्वे प्रवासात होणारा त्रास ब-याचदा प्रवाशांना सहन करावा लागतो. अस्वच्छता आणि कधी कधी तर उंदरांचा सुळसुळाटही रेल्वेत पाहावयास मिळतो. याविषयी प्रवाशांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी प्रवाशांना तातडीने मदत केल्याचेही आपण पाहिलेय. पण या तक्रारी अद्याप पूर्णपणे संपण्याचे नावचं घेत नाही आहेत. याचाच अनुभव मराठी अभिनेत्री निवेदिता अशोक सराफ यांना आला.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, निवेदिता सराफ या एका नाटकासाठी लातूर एक्स्प्रेसने प्रवास करत होत्या. एसी सेकंड क्लासने त्यांचा प्रवास सुरु होता. त्याच दरम्यान, त्यांनी आपली पर्स डोक्याखाली ठेवली होती. सकाळी त्या लातूरला पोहचल्या. तेव्हा आपले सामान चेक करताना त्यांना आपली पर्स उंदरांनी कुरतडल्याचे लक्षात आले. हल्ली उंदरांमुळे बरेचं आजार बळावत आहेत. कदाचित पर्सऐवजी उंदरांनी माझे केस कुरतडले असते किंवा माझ्या चेह-याला इजा झाली असती, अशी संतापजनक प्रतिक्रिया निवेदिता सराफ यांनी वृत्तवाहिनीद्वारे दिली. पण हे सर्व इतक्यावरच नाही थांबले. निवेदिता मुंबईला परतत असतानाही त्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. त्या ज्या रेल्वेने प्रवास करणार होत्या ती रेल्वे एक-दोन नव्हे तर तब्बल पाच तास उशिरा आली. त्यानंतर त्या रेल्वेत चढल्या असता टीसीने त्यांची आरक्षित सीट आधीच दुसऱ्या प्रवाशाला दिली होती.
संग्रहित लेख, दिनांक 26th Sep 2016 रोजी प्रकाशित
रेल्वे प्रवासात उंदीर ठरला अभिनेत्री निवेदिता सराफांची डोकेदुखी
एसी सेकंड क्लासने त्या प्रवास करत होत्या.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 26-09-2016 at 14:16 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress nivedita saraf faced inconvenience in latur express