दक्षिणात्य अभिनेत्री आणि नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. रश्मिका ही लवकरच मिशन मजनू या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ती चित्रपटांसह विविध कारणांमुळे चर्चेत आहे. पुष्पा या चित्रपटानंतर ती दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. रश्मिका ही अभिनेता विजय देवरकोंडासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोललं जातं. अनेकदा ते दोघेही एकत्र दिसतात. नुकतंच रश्मिकाने विजय देवरकोंडाबद्दलच्या नात्यावर खुलासा केला आहे.

‘कॉफी विथ करण ७’मध्ये करण जोहरने विजय देवरकोंडाला त्याची लव्ह लाइफ आणि कथित गर्लफ्रेंड रश्मिका मंदानाबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर विजय देवरकोंडा म्हणाला, “मी माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच रश्मिकासोबत दोन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती माझी डार्लिंग आहे आणि मला ती आवडते. माझ्यासाठी ती माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. जेव्हा तुम्ही एका चित्रपटात काम करता त्यावेळी बऱ्याच गोष्टींची देवाण- घेवाण होते. एकमेकांसोबत तुम्ही चढ- उतारांना सामोरे जाता. त्यावेळी तुमच्यात एक खास नातं तयार होतं. सामान्यपणे जेव्हा तुम्ही एकत्र काम करतो तेव्हा खूप वेगाने तुमच्यामध्ये बॉन्ड तयार होऊ लागतो. पण माझ्याबाबत हे थोडं कठीण आहे.”

यानंतर आता रश्मिकाने विजय देवरकोंडासोबतच्या नात्याबद्दल मौन सोडत स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी ती म्हणाली, “कधी कधी मला असे वाटते की मी वर्षातून पाच चित्रपट करतो आणि तुम्ही येता आणि मला विचारता की मी कोणाला डेट करते आहे. तसेच माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरु आहे, याबद्दल तुम्हाला विचारायचे असते. पण मला आता समजले आहे की आम्ही कलाकार आहोत. त्यामुळे आमच्याबद्दल सतत चर्चा होत असतात आणि लोकांना आमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडते.”

“जेव्हा तुम्ही माझ्या कामाबद्दल बोलता तेव्हा मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते. मी कोणता चित्रपट करत आहे, तो कधीपर्यंत प्रदर्शित होणार आहे याबद्दल मी तुम्हाला सांगू शकते. पण मला माझ्या खासगी आयुष्याबद्दल काहीही सांगायचे नाही. मी असं म्हणत नाही की मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही सांगायचे नाही. पण जोपर्यंत मला एखाद्या गोष्टीबद्दल खात्री होत नाही. मी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मी याबद्दल बोलणार नाही”, असेही रश्मिका मंदाना म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी ‘डियर कॉम्रेड’ आणि ‘गीता गोविंदम’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यांचे हे दोन्ही चित्रपट बरेच गाजले होते. विजयच्या कामाबद्दल बोलायचं तर तो लवकरच अनन्या पांडेसोबत ‘लायगर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरनं केली आहे.