scorecardresearch

रश्मिका मंदानाला पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते इतके मानधन, म्हणाली “मला तब्बल…”

नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणाऱ्या रश्मिकाने नुकतंच तिच्या पहिल्या पगाराबद्दल भाष्य केले आहे.

Rashmika Mandanna
रश्मिका मंदाना

दक्षिणात्य अभिनेत्री आणि नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. रश्मिका ही गेल्या काही दिवसांपासून पुष्पा या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानंतर ती दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. रश्मिका मंदाना ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मिशन मजनू या चित्रपटाद्वारे रश्मिका ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणाऱ्या रश्मिकाने नुकतंच तिच्या पहिल्या पगाराबद्दल भाष्य केले आहे.

रश्मिका मंदनाने नुकतंच ‘दैनिक भास्कर’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. यात ती म्हणाली की, “मला कधीही अभिनेत्री व्हायचे नव्हते. मला माझ्या वडिलांचा व्यवसाय सांभाळायचा होता. पण त्यावेळी माझ्याकडे इतका आत्मविश्वास नव्हता की मी लोकांच्या नजरेला नजर देत त्यांच्याशी बोलू शकते. त्यामुळेच मी शिक्षण पूर्ण करून वडिलांच्या व्यवसायात हातभार लावणार याचा विचार केला होता.”

“आमच्या मैत्रीतील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे…”, रश्मिका मंदानाने केला विजय देवरकोंडाबद्दल खुलासा

“पण माझ्या नशिबात अभिनेत्री होणं लिहिलं होतं. मी त्यावेळी मॉडेलिंगच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि त्यातूनच पुढे मी अभिनय क्षेत्राकडे वळली. जेव्हा मी माझा पहिला चित्रपट साइन केला होता, तेव्हा मी त्याबाबत घरातील कोणालाच सांगितले नव्हते. पण पहिल्या चित्रपटासाठी मला दीड लाखांचा चेक मिळाला होता. तेव्हा मला त्याचे काय करावे हेच समजत नव्हते.”

“त्यानंतर मी घरी जाऊन तो चेक तिच्या आईला दाखवला. माझी आई तो चेक पाहून घाबरली. त्यावेळी मी आईला मला अभिनेत्री व्हायचे आहे असे सांगितले. माझा हा निर्णय ऐकून वडील फार खूश होते. कारण त्यांना स्वत: अभिनेता व्हायचे होते. त्यांना चित्रपट पाहण्याचीही फार आवड आहे. त्यामुळे ते फार आनंदी होते”, असे ती म्हणाली.

समांथा ते रश्मिका; दाक्षिणात्य अभिनेत्री एका चित्रपटासाठी किती मानधन आकारतात?

रश्मिका मंदान्ना ‘मिशन मजनू’ व्यतिरिक्त ‘गुड बाय’ आणि ‘एनिमल’ सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘मिशन मजनू’मध्ये रश्मिकासोबत सिद्धार्थ मल्होत्रा झळकणार आहे. तर ‘अ‍ॅनिमल’मध्ये तिच्यासोबत रणबीर कपूर दिसणार आहे. या चित्रपटांशिवाय रश्मिका ‘पुष्पा: द रुल’ यांसह इतर दोन दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress rashmika mandanna reveals she got one and a half lakh rs cheque for her debut film nrp