‘हे’ असेल भन्साळी-सलमानच्या चित्रपटाचं नाव

तब्बल १९ वर्षानंतर संजय लीला भन्साळी आणि सलमान खानची जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार

सलमान खान आणि संजय लीला भन्साळी

चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी आणि अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा एकत्र चित्रपटात काम करणार असल्याच समोर आलं आहे. १९९९मध्ये प्रदर्शित झालेला संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटानंतर सलमान आणि संजय लीला भन्साळी ही जोडी एकत्र पडद्यावर पहायला मिळाली नव्हती. सूत्रांनुसार चित्रपट निर्मात्यांनी या चित्रपटाची दोन नावे रजिस्टर केली आहेत. ‘दिल दे दिया इन्शाअल्लाह’ आणि ‘प्यार हो गया इन्शाअल्लाह’ या दोन नावांपैकी कोणतं नाव ठेवायचं असा गहन प्रश्न भन्साळी यांच्या समोर उभा आहे. निर्मात्यांनी चित्रपटाची ही दोन्ही नावे ‘इंडियन मोशन पिक्चर प्रोडय़ुसर्स असोसिएशन’ (IMPPA)मध्ये नोंदवण्यात आली आहेत.

चित्रपटात सलमान खान सह अभिनेत्री आलिया भट्टची निवड करण्यात आल्याचं समजतंय. यापूर्वी चित्रपटाचे नाव ‘इन्शाअल्लाह’ असे ठरवण्यात आले होते. संजय लीला भन्साळी निर्मित हा चित्रपट २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच तब्बल १९ वर्षानंतर संजय लीला भन्साळी आणि सलमान खानची जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

बॉलिवूडचा दबंग खान सलमान गेल्या काही वर्षांपासून सतत अॅक्शनपटांमध्ये झळकत आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ या प्रेमकथेवर आधारित चित्रपटानंतर त्याने एकही रोमॅंटीक चित्रपट केला नाही. परंतू सलमानचा हा चित्रपट आजही प्रेक्षकांना पाहायला आवडतो. विषेश म्हणजे कोणतीही भूमिका असो सलमान त्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देतो. चाहते सलमानचा हा नवा लुक पाहण्यासाठी अत्यंत आतुर आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: After 19 years sanjay leela bhansali and salman khan working together