बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चर्चा व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे सुरु झाल्या आहेत. या व्हिडीओमध्ये लहानग्या आराध्याने दिलेला संदेश ऐकून सर्वजण भावूक झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आराध्याचा हा व्हिडीओ तिच्या शाळेतील एका कार्यक्रमामधील आहे. या कार्यक्रमात ती मंचावर उभी राहून सध्या संपूर्ण देशातील महिलांवर होणाऱ्या अन्याया विषयी भाषण देत असल्याचे दिसत आहे. दरम्यान आराध्याचा आत्मविश्वास पाहण्यासारखा आहे. ‘मी मुलगी आहे. मी नव्या पिढीचे स्वप्न आहे. मी अशा नव्या दुनियेत जगणार आहे जेथे मी सुरक्षित असेल, जिकडे मला प्रेम मिळेल’ असे आराध्या बोलताना दिसत आहे.

आराध्याचे भाषण ऐकून अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ‘आमच्या कुटुंबाचा अभिमान… मुलींचा अभिमान… सर्व महिलांचा अभिमान… आमची आराध्या’ असे लिहिले आहे.

त्यानंतर बिग बींनी आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ‘आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आणि एका लहान मुलीचा आवज. माझी आराध्या’ असे त्यांनी म्हटले आहे.

सध्या आराध्या धीरुभाई अंबानी शाळेत शिकत आहे. २० डिसेंबर रोजी तिच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन होते. या कार्यक्रमात संपूर्ण बच्चन कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. तसेच बॉलिवूडचा किंग शाहरुख खान देखील तेथे उपस्थित होता. आराध्याच्या भाषणने सर्वचजण भावूक झाले असल्याचे म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After hearing speech of aradhya bachchan amitabh bachhan feel proud avb
First published on: 23-12-2019 at 11:40 IST