scorecardresearch

न्यूड फोटोशूटनंतर रणवीर सिंगची पहिली पोस्ट चर्चेत, सिद्धार्थ जाधव म्हणाला…

न्यूड फोटोशूटच्या नंतर रणवीर सिंगने एक पोस्ट शेअर केली आहे.

siddharth jadhav ranveer singh
सिद्धार्थ जाधव रणवीर सिंग

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी रणवीरने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते. सध्या त्याच्या या फोटोंची सर्वत्र चर्चा सुरु असल्याचे दिसत आहे. एकीकडे यावरुन रणवीरला ट्रोल केले जात असताना दुसरीकडे अनेक कलाकार त्याचे समर्थन करत असल्याचे दिसत आहेत. नुकतंच न्यूड फोटोशूटच्या नंतर रणवीर सिंगने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

रणवीर सिंग हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. काही दिवसांपूर्वी रणवीर सिंगला आंतरराष्ट्रीय जाहिरात संघटनेकडून ब्रँड एंडोर्सर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकतंच त्याने या निमित्ताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने पुरस्कार मिळाल्याचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत.

न्यूड फोटोशूटमुळे रणवीर सिंगच्या विरोधात तक्रार दाखल, स्वरा भास्कर म्हणाली “मूर्खपणा…”

“मी एका अॅडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये कॉपी रायटर म्हणून माझा प्रवास सुरु केला आणि आता प्रतिष्ठित ब्रँड एंडोर्सर ऑफ द इअर या पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले. जीवनाचे एक चक्र पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. आंतरराष्ट्रीय जाहिरात संघटनेचे खूप खूप धन्यवाद”, असे त्याने म्हटले आहे.

त्यासोबत रणवीरने या पुरस्कार सोहळ्यातील काही फोटो देखील शेअर केले आहेत. यात तो फार आनंदात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या चेहऱ्यावर त्याला पुरस्कार मिळाल्याचा आनंद स्पष्ट झळकत आहे. दरम्यान रणवीरच्या या फोटोवर मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवनेही कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. रणवीरच्या या फोटोवर कमेंट करताना सिद्धार्थने ‘खूप खूप अभिनंदन भावा’ असे म्हटले आहे. फक्त सिद्धार्थ जाधवच नव्हे तर इतर अनेक कलाकारांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

“…अन् तेव्हा रणवीरने पँट काढली होती”, परिणीती चोप्राचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

दरम्यान रणवीर सिंगने हे न्यूड फोटोशूट ‘पेपर’ नावाच्या अमेरिकी मासिकासाठी करण्यात आलं आहे. या फोटोशूटमधील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये रणवीरच्या अंगावर एकही कपडा दिसत नाही. यावेळी रणवीरने बोल्ड पोजही दिली आहे. तर काही फोटोंमध्ये रणवीरने केवळ अंर्तवर्स्त्र परिधान केले आहेत. या नग्नावस्थेतील फोटोंमध्ये तो एका टर्कीश कार्पेटवर पोज देताना दिसत आहे. या प्रकरणानंतर रणवीर सिंगच्या विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामळे तो अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-07-2022 at 16:51 IST