बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी रणवीरने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. त्याचे हे फोटो पाहून अनेकजण त्याला ट्रोल करत आहे. तर काहींनी त्याला समर्थन करताना दिसत आहे. या सर्व प्रकरणानंतर रणवीर सिंगच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर आता यावर विविध कलाकार प्रतिक्रिया देताना दिसत आहे. नुकतंच अभिनेत्री स्वरा भास्करने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री स्वरा भास्कर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. स्वरा भास्कर ही नेहमी विविध मुद्द्यांवर तिचे मत व्यक्त करताना दिसते. काही दिवसांपूर्वी स्वरा भास्करने रणवीरच्या न्यूड फोटोशूटचे समर्थन केले होते. त्यानंतर आता तिने रणवीरविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवर प्रतिक्रिया दिली आहे.

“…अन् तेव्हा रणवीरने पँट काढली होती”, परिणीती चोप्राचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

स्वरा भास्करने नुकतंच ट्विटरवर याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यात तिने एका ट्वीटला रिट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये रणवीर सिंगविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती देण्यात आली आहे. या ट्वीटला रिट्वीट करत स्वरा भास्कर म्हणाली, “अविश्वसनीय मूर्खपणा आणि बेरोजगारी सध्या आपल्या देशात पसरली आहे.” तिच्या या ट्वीटनंतर अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.

दरम्यान रणवीर सिंगने हे न्यूड फोटोशूट ‘पेपर’ नावाच्या अमेरिकी मासिकासाठी करण्यात आलं आहे. या फोटोशूटमधील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये रणवीरच्या अंगावर एकही कपडा दिसत नाही. यावेळी रणवीरने बोल्ड पोजही दिली आहे. तर काही फोटोंमध्ये रणवीरने केवळ अंर्तवर्स्त्र परिधान केले आहेत. या नग्नावस्थेतील फोटोंमध्ये तो एका टर्कीश कार्पेटवर पोज देताना दिसत आहे. यानंतर रणवीर सिंग हा अडचणीत सापडला आहे.

रणवीर सिंगच्या विरोधात चेंबूर परिसरातील एका सामाजिक संस्थेचे ललित टेकचंदानी यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सकाळी रणवीर सिंहविरोधात भादंवि कलम २९२, २९३, ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदवला़ आहे. भारताला चांगली संस्कृती लाभली असून, या छायाचित्रामुळे महिलांसह सर्वाच्या भावना दुखावल्याचा आरोप तक्रारदाराने केला आह़े. त्यामुळे रणवीरला न्यूड फोटोशूट करणं महागात पडल्याचे दिसत आहे.