अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असणारा ‘पुष्पा’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुनचे डायलॉग, स्टाइल हे सर्वच चर्चेत आहे. रश्मिकाची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स केले आहेत. अशातच आता रश्मिकाने नवे घर खरेदी केल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या वर्षी फेब्रुवारी २०२१मध्ये रश्मिकाने मुंबईत नवे घर खरेदी केले होते. रश्मिका दाक्षिणात्य हिट चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्ये काम करताना दिसणार आहे. ती लवकरच ‘मिशन मजनू’ आणि ‘गुडबाय’ या चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. त्यामुळे ती मुंबईत शूटिंगसाठी येत असते. त्यामुळे तिने मुंबईत नवे घर खरेदी केले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण रश्मिकाने हे घर गेल्या वर्षी खरेदी केले असून ती आता या घरात शिफ्ट झाली आहे.
Video: फोटोग्राफर्सला पोझ देत असताना वारा आला अन्…; शिल्पा शेट्टीचा व्हिडीओ व्हायरल
‘पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. तर दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रुथ प्रभूने आटम सॉंग देखील केले आहे. या चित्रपटाने जगभरात जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई करत नवा रेकॉर्ड केला आहे.