सलमान खानच्या बहुप्रतिक्षित सुलतान चित्रपटातील सर्वच गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. पण त्यातील जग घुमिया या प्रेम गीताला प्रेक्षकांची अधिक प्रसिद्ध मिळाली. आधी राहत फतेह अली खान आणि त्यानंतर सलमानच्या आवाजात हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर आता अनुष्का शर्माचे व्हर्जनही प्रदर्शित करण्यात आले आहे.
सुलतानमधील अर्फा म्हणजेच अनुष्का शर्मावर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे गायिका नेहा भसिनने गायले आहे. तर इर्शाद कामिलने लिहलेल्या या गीतास विशाल-शेखर या संगीत दिग्दर्शक जोडीने संगीत दिले आहे.