‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यातच शुभ्रा व सोहमच्या जोडीने कमाल केली आहे. सध्या ऑनस्क्रीन जरी या दोघांचं जमत नसलं तरी या दोघांची ऑफस्क्रीन मैत्री कायम आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान शुभ्राच्या भूमिकेत आहे तर आशुतोष पत्की सोहम ऊर्फ बबड्याची भूमिका साकारत आहे. या दोघांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघंही बाइक-राइडचा आनंद लुटताना दिसत आहेत.

आशुतोषने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो पोस्ट केला आहे. ‘आपल्याच सारखा मित्र भेटणं ही गोष्ट फार अमूल्य असते’, असं त्याने कॅप्शन दिलंय. तेजश्रीसारखंच आशुतोषलाही बाइकची फार आवड असल्याचं या फोटोवरून दिसतंय. आशुतोषच्या या फोटोवर तेजश्रीने ‘आपण दोघं क्रेझी आहोत’ अशी कमेंट केली आहे. चाहत्यांनाही दोघांचा हा फोटो फार आवडत आहे. ‘तुम्हा दोघांची जोडी फार छान आहे’, अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. एका युजरने तर ‘तुम्ही खरंच लग्न करा’ असंही म्हटलंय.

https://www.instagram.com/p/B960iYqpPdf/

आणखी वाचा : चीड आणणाऱ्या ‘बबड्या’विषयी काही खास गोष्टी

तेजश्रीने ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन केलंय. तर आशुतोष पत्कीची ही पहिलीच मालिका आहे. आशुतोष हा संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. मालिकेतील त्याच्या अभिनयाचं फारच कौतुक केलं जात आहे. टीआरपीच्या यादीतही ही मालिका वरचढ ठरतेय.