मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चनने व्यक्त केलीये. याआधी तिने तामिळ, तेलुगू, बंगाली भाषांमधील प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम केलंय. विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाच्या संगीत अनावरण कार्यक्रमात ऐश्वर्या उपस्थित होती. यावेळी तिने म्हटले की, ‘मला मराठी चित्रपटात काम करायला आवडेल. दहा वर्षांपूर्वी विक्रम फडणीस यांनी मला मराठी चित्रपटात काम करण्यासाठी विचारले होते त्यावेळी मी नकार दिला होता. मात्र प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. मराठी चित्रपटात काम करण्याची ती वेळ नक्की पुन्हा येईल.’

करण जोहरचा हिट रोमॅण्टिक चित्रपट ‘ऐ दिल है मुश्किल’ यामध्ये ऐश्वर्या दिसली होती. एप्रिल महिन्यात तिच्या वडिलांचे निधन झाले. पण, आता ती पुन्हा तिच्या कामाकडे वळण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘जझ्बा’, ‘सरबजीत’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’सारख्या चित्रपटांमध्ये तिने अभिनयाची चुणूक पुन्हा दाखवून दिली. ‘जझ्बा’ आणि ‘सरबजीत’ बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कमाई करण्यात अयशस्वी ठरले तरी यातील ऐश्वर्याच्या कामाची आणि तिने स्वीकारलेल्या भूमिकांची सर्व स्तरातून प्रशंसा करण्यात आली होती.

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

वाचा : बाहुबली विरुद्ध बॅटमॅन..

‘हृदयांतर’ चित्रपटात सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे मुख्य भूमिका साकारणार आहेत. शेखर जोशी (सुबोध भावे), त्याची पत्नी समायरा जोशी (मुक्ता बर्वे), नित्या आणि नायशा या त्यांच्या दोन मुली यांच्याभोवती चित्रपटाची कथा फिरते. शेखर आणि समायराच्या १० वर्षांच्या मुलीला, नित्या जोशीला कर्करोग झाल्याचे स्पष्ट होते आणि त्या दोघांचे जगच बदलून जाते. अनेकदा आपण किती कणखर आहोत हे आपल्याला तेव्हाच कळते जेव्हा आपल्याकडे कणखर होण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताच पर्याय नसतो. कणखर होणं म्हणजे नक्की काय हे सांगणारा सिनेमा म्हणजे हृदयांतर…

वाचा : ‘भाभी जी घर पर है’मधील सौम्या टंडनला इस्तांबूलमध्ये लुबाडलं

विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि यंग बेरी एन्टरटेन्मेट निर्मित ‘हृदयांतर’चा सिनेमा याआधी ९ जूनला प्रदर्शित होणार होता. पण, आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलून ७ जुलै करण्यात आली आहे.