बॉलिवूडमधील अतिशय सुंदर अभिनेत्रींच्या यादीमधील सर्वात टॉपचे नाव म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या सारखीच दिसणाऱ्या एका मुलीची चर्चा रंगली आहे. ही मुलगी एक ब्लॉगर आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऐश्वर्या सारख्या दिसणाऱ्या या ब्लॅगरचे नाव आमना इमरान असे आहे. आमनाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर असे अनेक फोटो आणि व्हिडीओ आहेत ज्यामध्ये ती ऐश्वर्याला कॉपी करताना दिसत आहे. तिचे काही फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांना ऐश्वर्या राय बच्चन आणि आमना कोण हे ओळखणे देखील कठिण झाले आहे.

आमनाचे इन्स्टाग्रामवर दोन हजार फॉलोअर्स आहेत. आमना ही पहिली मुलगी नाही जी साधारण ऐश्वर्यासारखी दिसत आहे. मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकची देखील तुलना ऐश्वर्या रायसोबत केली जाते. मानसीने असे अनेक फोटोशूट केले होते ज्यामध्ये ती ऐश्वर्यासारखी दिसत होती. त्यावेळी मानसीने ऐश्वर्याची स्टाईल कॉपी केली अशा चर्चा रंगल्या होत्या.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने देखील आमनाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिचे फोटो शेअर करत त्याने ‘आखों का खेल’ असे कॅप्शन दिले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai bachchan looklike named aamna imran avb
First published on: 26-02-2021 at 17:15 IST