अजय-अतुल पहिल्यांदाच दिसणार हास्यजत्रेच्या मंचावर

संगीतकार जेव्हा विनोदी भूमिका करतो तेव्हा नक्की काय होतं, हे प्रेक्षकांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

ajay atul, ajay, atul, maharashtrachi hasyajatra,

अजय-अतुल या जोडीने अवघ्या महाराष्ट्राला आपल्या संगीतानी वेड लावलं. पण अजय-अतुल यांना भुरळ घातली ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत अगदी आवडीने पहिला जातो त्याचप्रमाणे अजय-अतुल हेसुद्धा हा कार्यक्रम न चुकता पाहतात. ‘इंडियन आयडल मराठी’ या सोनी मराठी वाहिनीवर २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कार्यक्रमात अजय-अतुल ही जोडी परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानिमित्ताने अजय-अतुल यांनी हास्यजत्रेच्या मंचावर हजेरी लावली.

अजय-अतुल ही जोडी हास्यजत्रेत आली असताना अतुल गोगावले यांनी हास्यजत्रेच्या मंचावर एका स्कीटचं सादरीकरण केलं. अजयसाठी हे सरप्राईज होतं. त्याला यातलं काहीच माहीत नव्हतं. आपल्या भावाला मंचावर पाहून अजयला आश्चर्यमिश्रित आनंद झाला. ‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमामध्ये परीक्षक होण्याचं आम्ही यासाठी ठरवलं की, त्यानिमित्ताने आम्हांला हास्यजत्रेच्या मंचावर जाता येईल, असंही ते या वेळी गमतीने म्हणाले.
Video : तेजस्वीने करण कुंद्राला बाथरुममध्ये बोलावले अन्…

आम्हाला हसवणाऱ्या आणि आमचं लॉकडाऊन सुसह्य करणाऱ्या हास्यजत्रेला आपल्या परीने काहीतरी द्यावं म्हणून एखाद्या स्कीटमध्ये सहभागी व्हावं, असं वाटल्याचं अतुल म्हणाला. संगीतकार जेव्हा विनोदी भूमिका करतो तेव्हा नक्की काय होतं, हे प्रेक्षकांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ajay atul going to be a part of maharashtrachi hasyajatra avb

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या