प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी कुटुंबीयांसह मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीच्या चरणी लीन झाले. आज(२६ मे) मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्स यांच्यामध्ये क्वालिफायर २साठी सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी अंबानी कुटुंबीयांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले.

मुकेश अंबानी यांच्यासह आकाश अंबानी त्याची पत्नी श्लोका अंबानी व नातू पार्थ अंबानीही सिद्धिविनायकच्या दर्शानाला पोहोचले होते. सिद्धिविनायक मंदिरातील आकाश अंबानीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. ‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये आकाश अंबानीने पांढऱ्या रंगाची हाफ पँट व फिकट हिरव्या रंगाचे टीशर्ट परिधान केल्याचं दिसत आहे.

Hanuman Temple Name in Pune Hanuman Jayanti 2024
‘जिलब्या मारुती, डुल्या मारुती…’ पुण्यातील प्रसिद्ध मारुती मंदिरांना का पडली असतील अशी नावे? जाणून घ्या…
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
Nagpur, people poisoned,
नागपूर : कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिरात २५ जणांना विषबाधा

हेही वाचा>> “थोडीतरी लाज…”, ६०व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट

सिद्धिविनायक गणपतीच्या मंदिरात हाफ पँट घालून गेल्यामुळे आकाश अंबानीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. त्याच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. “मंदिरात हाफ पँट घालून गेला आहे, आता कोणत्या पुजारीला यावर आक्षेप नसेल. पैसेवाल्यांसाठी वेगळा हिंदू धर्म आणि मध्यमवर्गीयांसाठी वेगळा,” अशी कमेंट एकाने केली आहे. “धार्मिक ठिकाणी शॉर्टस घालून जाऊ नये,” असंही एकाने म्हटलं आहे.

akash-ambani-troll

एका नेटकऱ्याने “सामान्य लोकांना मंदिरात तोकडे कपडे घालून जायला मनाई आहे. आणि मंदिरात असे कपडे घालूनही जाऊ नये,” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने “देवाकडे जाताना व्यवस्थित कपडे घालून जावं,” असं म्हटलं आहे.

akash-ambani-troll

हेही वाचा >> “काही व्यक्ती …”, विलासराव देशमुख यांच्या आठवणीत जिनिलीया भावुक, शेअर केली खास पोस्ट

“अशा कपड्यांना मंदिरात परवानगी आहे का?” असंही म्हटलं आहे.

akash-ambani-troll

दरम्यान, आकाश अंबानी लवकरच दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्याची पत्नी श्लोका अंबानी गरोदर आहे. त्यांना पृथ्वी हा मुलगा आहे.