रजनीकांत, अक्षय कुमार, अॅमी जॅकसन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘2.0’ हा चित्रपट त्याच्या बिग बजेटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. VFX चं बरंचसं काम बाकी असल्यानं या चित्रपटाचं प्रदर्शन लांबलं गेलं होतं. या स्पेशल इफेक्टसाठीच तब्बल ५४४ कोटींचा खर्च आला आहे. केवळ VFX साठी इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करणारा ‘2.0’ हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही महिन्यांपासून जगभरातल्या ३००० तंत्रज्ञांची टीम या चित्रपटाच्या निर्मितीसाठी आपला घाम घाळत आहेत. बिग बजेट चित्रपटाबरोबरच VFX तंत्राची कमाल घालून निर्माण केली जाणारी ही अप्रतिम कलाकृती पाहण्याचं कुतूहल अनेकांना आहे. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वारंवार पुढे ढकलली जात आहे, त्यामुळे चाहतेही नाराज आहेत. या चित्रपटाची पहिली झलक ऑगस्टमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार होती मात्र आता १३ सप्टेंबरला या चित्रपटाचा पहिला आणि बहुप्रतिक्षीत टीझर प्रदर्शित होणार आहे.

त्यामुळे चित्रपटाचं बटेज आणि कलाकार पाहता सगळ्यांनाच या चित्रपटाबद्दल कुतूहल निर्माण झालं आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘एंथरिन’ या चित्रपटाचा 2.0 हा सिक्वल आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं अक्षय कुमार पहिल्यांदाच तामिळ चित्रपटात तेही खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

जानेवारी २०१८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र याच महिन्यात ‘पद्मावत’ही प्रदर्शित होणार होता म्हणूनच चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. त्यानंतर चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होईल असं जाहीर करण्यात आलं. मात्र एप्रिलमध्येही हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी २९ नोव्हेंबर २०१८ ही तारीख निश्चित करण्यात आली. या चित्रपटाचे काही निवडक पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले , त्यातील अक्षय कुमारचं पोस्टर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar and rajinikanth 20 rs 550 crore on vfx
First published on: 10-09-2018 at 16:53 IST