नुकताच ‘चुंबक’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षयकुमार याच्या हस्ते प्रदíशत झाला. अक्षयकुमार मराठी चित्रपटांचा चाहता आहे. तो  मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाला चित्रपटाचे निर्माता नरेन कुमार, दिग्दर्शक संदीप मोदी तसेच गीतकार, गायक, कलाकार व या चित्रपटाचे मुख्य नायक स्वानंद किरकिरे, दोन नवोदित कलाकार संग्राम देसाई आणि साहिल जाधव सुद्धा उपस्थित होते. ‘जर मला वेगळ्या कथांवरील चांगल्या पटकथा मिळाल्या तर त्या मराठी चित्रपटांची मी केवळ निर्मितीच करणार नाही तर त्यामध्ये मी अभिनयसुद्धा करेन. दिवंगत दादा कोंडके या मराठीतील आघाडीच्या कलाकारावरील चरित्रपटाची निर्मिती करण्याचा प्रयत्नसुद्धा आम्ही केला होता. पण पटकथा मनासारखी जुळून आली नाही आणि तो प्रयत्न सोडून देण्याचा मी निर्णय घेतला. असे अक्षयकुमार म्हणाला.  मराठी चित्रपटांची बाजारपेठ दिवसेंदिवस वाढते आहे आणि मराठी चित्रपट आपल्या कक्षा अधिक रुंदावतो आहे. ज्या प्रकारच्या मराठी चित्रपटांची निर्मिती अलीकडे होते आहे आणि ज्याप्रकारे अस्सल व्यक्तिरेखा त्यात साकारल्या जात आहेत, त्या विश्वासार्ह अशाच आहेत. असे निरीक्षण अक्षयने नोंदवले. तो पुढे म्हणाला, ‘तुमच्या आयुष्यात दोन मार्ग असतात. एक चांगला आणि दुसरा वाईट. तुम्हाला त्यापकी कोणता निवडायचा हे ठरवायचे आहे. मी माझ्या २८ वर्षांच्या बॉलीवूडमधील कारकीर्दीत आत्तापर्यंत १३० चित्रपटांमध्ये काम केले आहे.’’

‘चुंबक’ चित्रपट हा चित्रपट २७ जुलला प्रदर्शित करण्यात येणार असून महाराष्ट्रातील ३०० चित्रपटगृहांमध्ये तो प्रदर्शित होणार आहे. अक्षयकुमारने हा चित्रपट प्रस्तुत केला असल्याने चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीवर त्याचा काही सकारात्मक परिणाम होईल का, असे विचारले असता तो म्हणाला की, चित्रपटाची कथा महत्त्वाची असून त्याची प्रस्तुती कोण करतो आहे, याला फार किंमत नाही. स्वानंद किरकिरेची तोंड भरून स्तुती करताना अक्षयकुमार म्हणाला,  मला जे इतकी वष्रे करायचे आहे ते स्वानंदने त्याच्या पहिल्याच चित्रपटात एक कलाकार म्हणून साध्य केले आहे.