गरीबाच्या घरच्या पाहुणचाराने अक्षय भारावला; शेअर केला फोटो

अक्षयने हा हृदयस्पर्शी अनुभव फेसबुक पोस्टद्वारे शेअर केला आहे

बॉलिवूडमधील खिलाडी अभिनेता अक्षय कुमार फिटनेस तसेच सामाजिक कार्यामुळे सतत चर्चेत असतो. अक्षय त्याच्या मुलांनादेखील फिटनेसचे धडे देत असतो. नुकताच अक्षय कुमार मुली नितारासोबत मॉर्निंग वॉकला गेला असल्याचा फोटो चर्चेत आहे.

अक्षय कुमारने त्याच्या अधिकृत फेसबुक पेजवर मुलीसोबत मॉर्निंग वॉकला गेल्याचा फोटो शेअर केला आहे. दरम्यान अक्षयने एका गरीबाच्या घरात जाऊन प्यायला पाणी मागितल्यानंतरचा हृदयस्पर्शी अनुभव सांगितला आहे. ‘आजचा मॉर्निंग वॉक हा माझ्या लहान मुलीसाठी एक धडा होता. आम्ही एका वृद्ध जोडप्याच्या घरी पिण्यासाठी पाणी मागण्यास गेलो आणि त्यांनी आम्हाला पाण्यासोबत खायलाही दिले. माझ्यासाठी हा हृदयस्पर्शी अनुभव होता’ असे अक्षयने कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : बिग बॉसच्या पहिल्या पर्वातील हा स्पर्धक अडकणार विवाह बंधनात?

नुकताच अक्षयचा ‘हाऊसफूल ४’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या पाच दिवसांत १०० कोटी रुपयांचा पल्ला गाठला आहे. ‘हाऊसफुल’ या फ्रँचाइजीमधला ‘हाऊसफुल ४’ हा चौथा चित्रपट आहे. अक्षय कुमारसोबतच रितेश देशमुख, क्रिती सनॉन, बॉबी देओल, पूजा हेगडे आणि क्रिती खरबंदा अशी कलाकारांची फौज यामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजीने केले आहे. दिग्दर्शक साजिद खानवर #MeToo मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर फरहादकडे दिग्दर्शन सोपवले गेले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Akshay kumar share heart touching experience with daughter in old poor couple house avb

ताज्या बातम्या