‘या’ दिवशी प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट?

यापूर्वी हा चित्रपट ३० एप्रिलला प्रदर्शित होणार होता.

akshay kumar starrer films sooryavanshi
याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिन कैफ यांचा आगामी चित्रपट ‘सूर्यवंशी’ अद्याप प्रदर्शित झालेला नाही. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. जवळपास वर्षभरापासून या चित्रपटाचे प्रदर्शन थांबलेले आहे. आता हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘सूर्यवंशी’ हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. पण याबाबत चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक किंवा अभिनेत्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ‘बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइड’ने दिलेल्या वृत्तानुसार सूर्यवंशी चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख ठरवली आहे. ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

आणखी वाचा : स्वत:ला ‘हॉट संघी’ म्हणत कंगनाने शेअर केले बिकिनीमधील फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ट्रेलर पाहाताचा चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह आणि अजय देवगण पाहुण्याकलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. या चित्रपटात अक्षय पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी हा चित्रपट ३० एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. ‘सिंघम’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘सिंबा’ यानंतर पोलीसांवर आधारित चित्रपटांच्या मालिकेतला ‘सूर्यवंशी’ हा रोहितचा चौथा चित्रपट आहे.

‘सूर्यवंशी’ चित्रपटाशिवाय अक्षय कुमारचे आणखी काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये ‘बेल बॉटम’, ‘पृथ्वीराज’, ‘अतरंगी रे’, ‘बच्चन पांडे’, ‘राम सेतु’, ‘रक्षाबंधन’ या चित्रपटांचा समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Akshay kumar sooryavanshi new released date avb