अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ होणार ओटीटी प्लटफॉर्मवर प्रदर्शित?

हा चित्रपट २८ मे रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार होता.

Akshay Kumar, Bellbotom,

बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त कुणाचे चित्रपट प्रदर्शित होत असतील तर ते म्हणजे अभिनेता अक्षय कुमारचे. पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अक्षयच्या चित्रपटांचे देखील प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. गेल्या वर्षी पासून अक्षयच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात येत आहे. आता त्याचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

काही दिवसांपूर्वी अक्षयचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित होणार होता. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. ‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बेल बॉटम’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा चित्रपट २८ मे रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार होता. पण सध्याची परिस्थिती पाहाता निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

आणखी वाचा : ‘बिग बॉस’ फेम साहिल आनंदच्या घरी नव्या पाहुण्याचे आगम

‘बेल बॉटम’ चित्रपटाचे निर्माते निखिल आडवाणी स्वत: चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. आता हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

‘बेल बॉटम’ चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री हुमा कुरेशी, वाणी कपूर, लारा दत्ता या अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार या वर्षात एकापेक्षा एक हिट चित्रपट देण्यास तयार आले. येत्या काळात ‘सूर्यवंशी’, ‘पृथ्वी राज’, ‘बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’ ‘धूम 4’ असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Akshay kumar starrer bell bottom is being considered to release on ott platform avb

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या