गेल्या महिन्याभरापासून बॉलिवूडच्या तीन सिनेतारकांना अंडरवर्ल्डकडून धमकावले गेले आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिध्द गायक सोनू निगमला धमकावले गेले होते. त्यापाठोपाठ आता  बॉलिवूडमधील आघाडीचा अ‍ॅक्शन हिरो अक्षय कुमारला अंडरवर्ल्डकडून धमक्यांचे फोन येत आहेत. याबाबत अक्षयकुमारच्या कार्यालयाकडून जुहू पोलीस ठाण्यात २२ ऑक्टोबर रोजी लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी अक्षयच्या सुरक्षा बंदोबस्तात वाढ केली आहे. मात्र, यासंदर्भातील अधिक माहिती अद्याप कळू शकलेली नाही.
जीवे मारण्याच्या धमकीनंतर राम गोपाल वर्माला पोलिसांचे संरक्षण
गेल्या काही महिन्यात बोनी कपूर, करण जोहर आणि सोनू निगम यांना अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळाल्या आहेत. सोनू निगमला छोटा शकीलच्या नावाने धमकावण्यात आले होते. सोनूला जीवे मारण्याबरोबर त्याचे वैयक्तीक आयुष्यही उघड करण्याची धमकी दिली होती.