बॉलिवूड सिनेतारकांचे आपल्या मुलांप्रतीचे प्रेम अनेक वेळा सोशल मीडियावर व्यक्त होताना पाहायला मिळते. अलिकडेच बॉलिवूड अभिनेता आणि मार्शल आर्टपटू अक्षय कुमारनेदेखील इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईटवर मुलगा आरवबरोबरचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या खेळाबाबतच्या प्रेमासाठी प्रसिद्ध आहे. अलिकडेच त्याने मुलाच्या शाळेतील व्हॉलीबॉल कोर्टवर मुलगा आरवसह व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद लुटला. अक्षय कुमारने सामना संपल्यानंतर मुलगा आरव, शिक्षक आणि संपूर्ण संघाचे काढण्यात आलेले छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे. या अविस्मणीय क्षणाबाबत अक्षयने प्रसिद्ध केलेल्या संदेशात तो म्हणतो, बऱ्याच काळानंतर वेळ मजेत घालवला! माझी दोन्ही मुले आणि त्यांच्या शिक्षकांबरोबर त्यांच्या शाळेत व्हॉलिबॉल खेळायची संधी मिळाली. सर्वांचे आभार, खरोखर खूप मजा आली.