बॉलीवूड अभिनेत्यांना आपल्या चिमुरड्यांसोबत वेळ घालवण्याची संधी फार कमी वेळा मिळते. त्यात शाहरुख तर आपल्या छोट्या मुलाला म्हणजेच अबरामला चित्रपटाच्या सेटवरच घेऊन फिरताना दिसतो. पण बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आपल्या लहानग्या लेकीला सेटवर नेण्यापेक्षा तिच्यासोबत घरी वेळ घालवणे सोयीस्कर समजतो.
काही दिवसांपूर्वी अक्षय नितारासोबत (त्याची मुलगी) बागेत जाऊन कै-या तोडत असल्याचा पुन्हा घसरगुंडीवर खेळत असल्याचे फोटो ट्विंकलने प्रदर्शित केले होते. पण यावेळी तर अक्षयने त्याच्या लेकीसाठी चक्क लंकाच तयार केली आहे. ठोकळ्यांची इमारत बनवून तिला ‘लंका २’ असे नाव दिल्याचे ट्विंकलने ट्विट केले आहे. ही इमारत गुलाबी रंगाच्या गाडीवर ठेवलेली दिसते. त्या गाडीतून हनुमान सीतेला घेऊन जात आहे, असेही तिने म्हटलेय.


अक्षयला आरव आणि नितारा ही दोन मुले आहेत. या दोन्ही मुलांसोबत आणि पत्नीसोबत एकत्र वेळ घालावयाला त्याला खूप आवडते. काहीच दिवसांपूर्वी अक्षय ट्विंकलला मुंबईतील ताज हॉटेलमध्ये रात्रीच्या भोजनाला घेऊन गेला होता.