बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार ‘जॉली एलएलबी २’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्कीच्या प्रत्येक चित्रपटाबद्दल त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिलेली असते. याआधीच्या चित्रपटात जॉलीची भूमिका अभिनेता अर्शद वारसीने केली होती. तो चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. त्यामुळे खिलाडीच्या आगामी चित्रपटातील त्याचे वकिलाच्या भूमिकेतील डावपेच पाहण्याची प्रेक्षकांतील उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ‘जॉली एलएलबी’ या सुभाष कपूर दिग्दर्शित सिक्वलमध्ये चित्रपटाच्या अक्षय कुमार जॉलीच्या म्हणजेच जगदीश्वर मिश्राच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या अक्षय कुमार या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दुबईमध्ये व्यग्र आहे. दुबईमधील बॉलिवूड पार्कमध्ये प्रमोशन दरम्यान अक्कीने धम्माल नृत्य सादर करताना देखील पाहायला मिळाले. ‘गो पागल..’ या चित्रपटातील गाण्यावर अक्षय थिरकताना दिसत असलेल्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अक्षयची या चित्रपटातील नायिका हुमा कुरेशीची झलक देखील पाहायला मिळत आहे.
PIC : @akshaykumar and @humasqureshi clicked at @bollywoodparks Today
JOLLY IN DUBAI pic.twitter.com/jRt6N1Gv6h
— Akshay Kumar Fans Group (@AKFansGroup) February 4, 2017
The stylish @akshaykumar sir in Dubai for #JollyLLB2 promotions.
JOLLY IN DUBAI #5DaysToJollyLLB2 pic.twitter.com/uFaz13iIL1
— Whitty Rosy (@ros9373) February 5, 2017
अक्कीच्या आगामी चित्रपटाबद्दल असणारी उत्सुकता ही ट्विरवर देखील पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला ट्विटरवर ‘जॉली इन दुबई’ हा ट्रेंण्ड दिसत आहे. नेटीझन्समध्ये अक्षय कुमारच्या चित्रपटाबाबत उत्सुकता दिसून येत आहे. विवेक सोलंकी याने अक्षयच्या चित्रपटाची उत्सुकता व्यक्त करताना भारतीय टेलिव्हिजनवरील प्रमोशनचा फोटो शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता दाखवून दिली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘जॉली एलएलबी २’ चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. एका किचकट खटल्यामध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे शोधण्यासाठी येणाऱ्या अडचणी, त्या अडचणींवर मात करणारा ‘जॉली’ आणि त्याच्या वाटेमध्ये अडथळा बनून येणारे काही लोक ट्रेलरमध्ये दिसले होते. ट्रेलरला प्रेक्षकांनी दिलेली पसंती ही बॉक्स ऑफिसवर अक्कीचा चित्रपट धम्माल उडवून देणार अशी प्रचिती देणारा असाच होता.
https://twitter.com/AkshaySolapurFC/status/827921586133012485
अक्षयच्या या चित्रपटाच्या दोन टिझरला उदंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. पहिल्या विनोदी टिझरनंतर दुसऱ्या टिझरमध्ये चित्रपटात अक्षय रहस्यमय घटनांचा उलगडा करणार असल्याची झलक पाहायला मिळाली होती. २०१३ मध्ये आलेल्या ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. या चित्रपटामध्ये अर्शद वारसी आणि बोमन इराणी यांची मुख्य भूमिका होती. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील कलाकार यामध्ये नसले तरी या चित्रपटासाठी ‘जॉली एलएलबी’च्या कलाकारांनी केलेल्या मदतीबद्दल अक्षयने आभार व्यक्त केले होते. अक्षयचा हा चित्रपट १० फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
This is how @akshaykumar brought the house down in Dubai! #6DaysToJollyLLB2 JOLLY IN DUBAI #GoPagal @humasqureshi @subkapoor pic.twitter.com/IbDnVuTwZm
— Star Studios (@starstudios_) February 4, 2017