scorecardresearch

Premium

‘अलबत्या गलबत्या’चा ७५वा प्रयोग

मे २०१८ मध्ये या नाटकाचे नव्या संचातील प्रयोग सुरू झाले

‘अलबत्या गलबत्या’चा ७५वा प्रयोग

सध्या चर्चेत असलेले आणि रंगभूमीवर प्रचंड गाजत असलेले रत्नाकर मतकरी यांचे ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक बाल रसिकांसाठी पुन्हा एकदा पुस्तक रूपाने प्रकाशित होत आहे. रत्नाकर मतकरी यांनी ‘हॅन्स अ‍ॅण्डरसन’ या जगविख्यात परीकथा लेखकाच्या ‘दि टीडर बॉक्स’ या परीकथेवर आधारित ‘राजकन्या आणि जादूची आगपेटी’ हे नाटक लिहिले. नंतर त्यात बरेच फेरबदल करून त्यांनी ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक १९७२ साली लिहिले. हे नाटक नव्याने रंगभूमीवर आले आणि आता या नाटकाने ७५व्या प्रयोगापर्यंतचा पल्ला गाठला आहे.

मे २०१८ मध्ये या नाटकाचे नव्या संचातील प्रयोग सुरू झाले; आणि गेल्या दोन महिन्यांत या नाटकाने बालप्रेक्षकांची मने जिंकली. रविवारी, ८ जुलै २०१८ रोजी या नाटकाचा ७५वा प्रयोग शिवाजी मंदिर येथे सकाळी ११.०० वाजता सादर होणार असून ‘अलबत्या गलबत्या’ या नाटय़संहितेची नवीन आवृत्ती या प्रयोगात प्रकाशित होत आहे. या वेळी रत्नाकर मतकरी, पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ आणि ‘झी वाहिनी’चे नीलेश मयेकर उपस्थित राहणार आहेत. या नाटकाची नाटय़संहिता प्रथम ‘पॉप्युलर प्रकाशन’ने १९७३ साली प्रकाशित केली होती. आता नव्या मुखपृष्ठासह नवीन मांडणीतील ही आवृत्ती बालरसिकांना नक्कीच आकर्षित करणारी आहे.

inspirational story kalpana-saroj
बाराव्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून छळ; दोन रुपयांपासून कमाईला सुरुवात करणाऱ्या कल्पना सरोज ९०० कोटींच्या मालकीण बनल्या कशा?
nathuram-godse-boltoy-sharad ponkshe
“अखेरचा राम राम नथुराम…” ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’च्या शेवटच्या प्रयोगानिमित्त शरद पोंक्षे यांची भावुक करणारी पोस्ट
Controversial board regarding Babri Masjid in the premises of FTII controversy among student organizations
‘एफटीआयआय’च्या आवारात बाबरी मशिदीबाबत वादग्रस्त फलक, विद्यार्थी संघटनांमध्ये बाचाबाची
ram temple
रील्स, Vlog अन् बरेच काही! प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे ‘सणात’ रूपांतर करण्यामागे समाजमाध्यमाची भूमिका काय? वाचा…

नुकताच रत्नाकर मतकरी यांना त्यांच्या एकूण बालरंगभूमीवरील योगदानाबद्दल साहित्य अकादमीचा बालसाहित्याचा पुरस्कार घोषित करण्यात आला. बालरंगभूमीवरील त्यांनी केलेल्या आजवरच्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव झाला आहे. मराठी बालरंगभूमी केवळ टिकवून ठेवण्याचेच नव्हे तर आपल्या अनेक उत्तमोत्तम नाटकांच्या साहाय्याने तिला सोनेरी दिवस प्राप्त करून देण्याचे सारे श्रेय मतकरींनाच जाते. ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक १९७२ साली प्रथम रंगभूमीवर आले, मात्र पंचेचाळीस वर्षांनंतरही त्यातील ताजेपणा कायम आहे. हीच मतकरींच्या लेखणीची खरी किमया आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Albatya galbatya marathi natak

First published on: 08-07-2018 at 03:55 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×