एकामागोमाग एक बॉलिवूड अभिनेत्रींचे फेक न्युड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दीपिका पदुकोणनंतर आता आलिया भट्टचाही फेक न्युड फोटो व्हायरल झाला आहे.
PHOTO: आणखी एक अभिनेत्री गुपचूप अडकली विवाहबंधनात
आलियाचा हा फोटो मॉर्फ करुन एका मासिकाचा कव्हर फोटो असल्याचे दाखवण्यात आले आहे. या मासिकावरील एका मॉडेलच्या चेहऱ्याऐवजी आलियाचा चेहरा लावण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोणचाही एक फोटो मॉर्फ करण्यात आला होता. या फोटोमध्ये तिला एका मॉडेलसोबत ‘मॅक्सिम’ मासिकाच्या कव्हर पेजवर नग्न दाखण्यात आले होते. या मासिकावर सुपर वुमन असे लिहिले होते. दीपिकाचा याआधीही एक फेक फोटो व्हायरल झाला होता. तिच्या एका फोटोला फोटोशॉप करुन तिला व्हिक्टोरियाज एंजल दाखवण्यात आले होते.
दीपिका आणि आलियासारखेच सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन यांचेही बिकनीमध्ये फोटोशॉप केलेले फोटो व्हायरल झाला होते. यातून नवाब खानची पत्नी अर्थात करिना कपूर खानही वाचली नाही. ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या यांचा एक फोटो व्हायरल होत होता जो पूर्णतः फेक होता. कोणा परदेशातील महिलेच्या चेहऱ्यावर ऐश्वर्याचा चेहरा लावण्यात आलेला. रुग्णालयातील या फोटोला आराध्याच्या जन्मानंतरचा पहिला फोटो असे सांगून व्हायरल करण्यात आले होते.
आलियाने आपल्या या फेक फोटोवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आलियाची प्रेक्षकांसमोरची प्रतिमा आजही चांगली आहे. त्यामुळेच तिच्या चाहत्यांना हा फोटो पाहून नक्कीच राग आला असेल.