बॉलीवूडकरांनी चित्रपटांसाठी टॅटू काढणे ही काही नवीन बाब नाही. दीपिका पदुकोण, शाहिद कपूर, वरुण धवन यांनी आपल्या चित्रपटासाठी टॅटू काढले होते. त्यानंतर आता आलियादेखील या पंक्तीत आली आहे. आगामी ‘शानदार’ चित्रपटासाठी तिने हाताच्या एका बोटावर ‘यूजलेस’ असे गोंदवून घेतले आहे.
उजव्या हाताच्या अनामिकेवर आलियाने यूजलेस असे गोंदवून घेतले आहे. आणि यामागचे तिचे कारण ऐकून तुम्हाला अजिबात आश्चर्याच धक्का बसणार नाही. ‘नींद ना मुझको आए’ या गाण्याच्या प्रसिद्धीवेळी ती म्हणाली की, जर सूला झाली असेल तर करंगळी दाखवतात, मधले बोट कशासाठी वापरतात ते तुम्हाला चांगलेचं माहित आहे. तर्जनी दिशा दर्शवण्यासाठी वापरली जाते. डाव्या हाताची अनामिका साखरपुड्याची अंगठी घालण्यासाठी वापरतात. पण, उजव्या हाताच्या अनामिकेचे काय? ते तर ‘यूजलेस’ आहे. आता आलियाच्या या ‘लॉजिक’बद्दल आपण काही न बोललेलेचं बरे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Oct 2015 रोजी प्रकाशित
एक बोट ‘युजलेस’ असल्याचा आलियाला साक्षात्कार!
उजव्या हाताच्या अनामिकेचे काय? ते तर 'यूजलेस' आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 12-10-2015 at 11:52 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt gets useless tattoo for her finger