अभिनेत्री आलिया भट्टने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आलिया बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. जगभरात तिचे लाखो चाहते आहेत. आलियाने आतापर्यंत एकापेक्षा एक उत्तम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लवकरच ती हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून आलियाचा हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’मध्ये गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला आहे. ज्यात आलिया भट्ट अॅक्शन अवतारात पाहायला मिळत आहे.

आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूड डेब्यू चित्रपटातील फर्स्ट लूकचा व्हिडीओ शेअर केला आहे. आलियाने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले, ‘हार्ट ऑफ स्टोन आणि कियाचा फर्स्ट लूक. 2023 मध्ये Netflix वर येत आहे.’ आलियाच्या या पोस्टवर तिची आई सोनी राझदानने कमेंट केली, ‘ओह फॅब! हे खूप रोमांचक आहे!’ तर अर्जुन कपूरने लिहिले, ‘ही खूप मोठी गोष्ट आहे… अभिमानास्पद.’ याशिवाय चाहत्यांनीही ‘व्वा’, ‘अद्भुत’ आणि ‘खूपच उत्सुक आहोत’ अशा कमेंट करत या टीझरवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Hyundai Motor Company, South Korea, PT Adaro Minerals Indonesia Tbk, agreement, aluminium supply
विश्लेषण :`के-पॉपʼ चाहत्यांसमोर ह्युंदाईचे लोटांगण? इंडोनेशियाबरोबर ॲल्युमिनियम करार का रद्द झाला?
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?
True and pure love
आयुष्यात फक्त असं प्रेम मिळाले पाहिजे! आजोबांना घास भरवणाऱ्या आजींचा व्हिडीओ बघाच
viral video street vendor selling momo burger
Video : बर्गरमध्ये घातले ‘मोमो अन् नूडल्स’! पण जंक फूडच्या या ढिगावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांनी व्हाल चकित

आणखी वाचा- Heart of Stone : आलियाच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित, अभिनेत्रीने जिंकली भारतीयांची मनं

‘हार्ट ऑफ स्टोन’मधील आलिया भट्टचा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट करत नेटकरी आलियाचं कौतुक करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिलं, “आलिया तुझा आम्हाला अभिमान वाटतो.” दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आलिया भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेत्री आहे.” तर आणखी एकाने, “तुझ्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहोत.” अशी कमेंट केली आहे.

आणखी वाचा- “मालिकांमुळे टीव्ही जगताचा सत्यानाश…” एकता कपूरवर भडकले मुकेश खन्ना

दरम्यान या चित्रपटात आलिया भट्टची खास भूमिका असणार आहे. या चित्रपटात ती किया धवन ही भारतीय व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. याच व्हिडीओमध्ये ती आपला अनुभव सांगताना दिसत आहे. ती म्हणते, “या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेशी तुम्ही जोडले जाता. ती तुम्हाला आपली असल्यासारखी वाटते.” या चित्रपटाचं दिग्दर्शन टॉम हार्परने केलं असून यात सोफी ओकोनेडो, मॅथियास श्वेघोफर, जिंग लुसी आणि पॉल रेडी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत.