आज अभिनेत्री आलिया भटचा वाढदिवस. त्यानिमित्त तिने आपल्या चाहत्यांना एक सरप्राईज दिलं आहे. आपल्या आगामी बहुचर्चित सिनेमातला लूक तिने शेअर केला आहे.

‘आरआरआर’ या दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या चित्रपटात आलिया महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ‘सीता’ या भूमिकेतला तिचा पहिला लूक तिने ट्विटरवरुन शेअर केला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राजामौली यांनीही हा लूक शेअर केला आहे. यात तिने हिरवी साडी, नाजूक बिंदी, झुमके असे पारंपरिक दागिने घातले आहेत. आलियाचा हा संस्कारी अवतार तिच्या चाहत्यांसाठी सरप्राईज ठरला आहे.

या चित्रपटाची भरपूर चर्चा सुरु होती. या चित्रपटाचं नाव ‘आरआरआर’ म्हणजे ‘रौद्रम रणम रुधिरम’ असं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश करत आहे. या चित्रपटात राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगन, समुथीराकिनी, ऑलिव्हिया मॉरिस असे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या १३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा- Birthday Special: ‘स्टुडंट ऑफ द इअर’ ते ‘गंगूबाई काठियावाडी’, आलियाचा प्रवास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९२०च्या दशकातली ही कथा असून उत्तर भारतातल्या दोन आदिवासी प्रमुख नेत्यांसंदर्भातली आहे. हे दोन नेते म्हणजे अल्लुरी सिताराम राजू आणि कोमाराम भीम. या दोन्ही भूमिका अनुक्रमे रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर करत आहेत.  खरंतर हा चित्रपट गेल्या वर्षी जुलैमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, करोनाच्या संकटामुळे प्रदर्शन लांबणीवर पडलं. या व्यतिरिक्त आलिया ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि ‘ब्रम्हास्त्र’ अशा दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘ब्रम्हास्त्र’मध्ये तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता रणबीर कपूरही दिसणार आहे.