Allu Arjun Birthday: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आज वाढदिवस आहे. ‘येवडू’, ‘सरनायडू’, ‘द वॉरियर’, ‘डिजे’, ‘गीता गोविंदम’ असे एक सो एक हिट चित्रपट देऊन अल्लू अर्जुनने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने अल्लू अर्जुनच्या चाहत्यांमध्ये भर पडली. या चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. त्याच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही करण्यात आलं होतं.

‘पुष्पा’मधील अल्लू अर्जुनचा झुकेगा नही साला हा डायलॉगही लोकप्रिय ठरला होता. चाहत्यांसह सेलिब्रिटींनाही या डायलॉगची भुरळ पडली होती. आज अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हि़ड वॉर्नरने अभिनेत्याला खास पुष्पा स्टाइलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. वॉर्नरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा>> Video: हास्यजत्रेतील ‘अवली लवली’ची ‘मुंबई इंडियन्स’लाही भुरळ, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा व्हिडीओ व्हायरल; नम्रता संभेराव कमेंट करत म्हणाली…

“हॅपी बर्थडे पुष्पा” असं म्हणत वॉर्नरने अल्लू अर्जुनला शुभेच्छा दिल्या आहेत. झुकेगा नही सालाची हुक स्टेप करत “आम्ही ‘पुष्पा २’ची वाट पाहत आहोत,” असं वॉर्नरने म्हटलं आहे. वॉर्नरने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याची लेक इस्लाही दिसत आहे. इस्लानेही अल्लू अर्जुनला शुभेच्छा दिल्या आहेत. वॉर्नरने हा व्हिडीओ शेअर करत लेक इस्ला अल्लू अर्जुनची चाहती असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा>> Pushpa 2 teaser: ‘पुष्पा २’चा टीझर शेअर करत श्रेयस तळपदेची खास पोस्ट, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘पुष्पा’ला मिळालेल्या भरघोस प्रेमानंतर या चित्रपटाचा सिक्वेल ‘पुष्पा २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच ‘पुष्पा २’ चा टीझर प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर ‘पुष्पा २’मधील अल्लू अर्जूनचा फर्स्ट लूकही समोर आला आहे.