‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ चित्रपट अभिनेता जॉनी डेप त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पूर्वाश्रमीची पत्नी अँबर हर्डच्या विरोधात जॉनीने पुन्हा एकदा कोर्टात मानहानीचा अर्ज दाखल होता, त्यामुळे ते दोघेही सातत्याने चर्चेत आहेत. दरम्यान, हा मानहानीचा खटला जॉनी डेपने जिंकला आहे. त्यामुळे आता अँबर हर्डला जॉनी डेपला १५ मिलियन डॉलर म्हणजे ११६ कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागणार आहे. मात्र, या निकालानंतर एम्बरच्या वकिलाने ती इतकी मोठी रक्कम भरपाई म्हणून देण्यास सक्षम नसल्याचे म्हटले आहे.

जॉनी आणि अँबरच्या केसची सुनावणी ६ आठवडे चालली. या घटस्फोट प्रकरणाची जोरदार चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. या खटल्यात कोण जिंकणार, याबद्दल अंदाजही बांधले जात होते. अखेर हा खटला जॉनी डेपने जिंकला. निकालानंतर अँबर भरपाईची एवढी मोठी रक्कम भरू शकत नसल्याचं म्हटलंय. अँबरकडे जॉनीला भरपाई म्हणून देण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. न्यायालयाच्या निर्णयानंतर ती पुढे अपील करणार असल्याचेही एम्बरने म्हटले आहे. वास्तविक, बऱ्याच रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की अँबर हर्डची एकूण संपत्ती फक्त ८ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ६२ कोटी आहे. अशा परिस्थितीत, ती एवढी मोठी रक्कम नुकसान भरपाई देऊ शकत नाही.

आणखी वाचा : “तरुण दिसण्यासाठी मी विष्ठा सुद्धा खायला तयार आहे”; अभिनेत्रीचे धक्कादायक विधान

एम्बर हर्डने २०१३ ते २०१९ दरम्यान १० मिलियन डॉलर्स कमावले आहेत. तिच्याकडे सुमारे ८ मिलियन डॉलर किमतीचे घर आणि अनेक कार्स आहेत. याशिवाय, जॉनी डेपपासून घटस्फोट घेतल्यानंतर, तिला पोटगी म्हणून ७ मिलियन डॉलर मिळाले होते. त्यावर ही संपूर्ण रक्कम दान करणार असे तिने म्हटले होते. परंतु, अँबरने या रक्कमेतील एक ही पैसा दान केलेला नाही, असं या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान समोर आलंय. त्यामुळे अँबर जवळचा इतका पैसा गेला कुठे? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

आणखी वाचा : अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगत रितेश देशमुख, म्हणाला “मामांसोबत…”

दुसरीकडे, जॉनी डेपबद्दल बोलायचे तर, त्याने हॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि तो एक प्रसिद्ध सुपरस्टार आहे. त्याची एकूण संपत्ती १५० मिलियन डॉलर म्हणजे जवळपास १ हजार १६३ कोटींपेक्षा जास्त असल्याचे मानले जाते. ५८ वर्षीय जॉनी डेपचा पहिला चित्रपट वयाच्या २१ व्या वर्षी प्रदर्शित झाला होता आणि तेव्हापासून त्याने ७० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अँबर हर्डबद्दल सांगायचे तर, तिने २००४ पासून आतापर्यंत सुमारे ४० चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु यापैकी मोजकेच चित्रपट असे आहेत की ज्यांना सुपरहिट किंवा मोठा चित्रपट म्हणता येईल.

आणखी वाचा : “असा चित्रपट करताना लाज वाटली पाहिजे…”, ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटावरून केआरकेने केली अक्षय कुमारवर टीका

अशी झाली वादाची सुरुवात

घटस्फोटानंतर अँबर हर्डने दावा केला होता की जॉनी डेप दारूच्या नशेत तिला मारहाण करायचा. मात्र जॉनी डेपने हे आरोप फेटाळून लावले. २०१८ मध्ये अँबर हर्डने मध्ये वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक ओपिनियन पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये त्याने स्वत:ला घरगुती हिंसाचारातून वाचलेले असल्याचे सांगितले होते. अँबर हर्डने त्यात जॉनी डेपचे नाव घेतले नाही, पण ती त्याच्याकडे बोट दाखवत असल्याचे दिसून आले होते. जॉनी डेपलाही याची जाणीव झाली आणि त्यांनी अँबर हर्डवर मानहानीचा खटला दाखल केला होता.

आणखी वाचा : ‘रानबाजार’मुळे प्राजक्ता-तेजस्विनीला ट्रोल करणाऱ्यांना सचिन खेडेकरांनी दिलं उत्तर, म्हणाले “मराठी प्रेक्षक…”

एम्बर हर्डबद्दल वापरले होते अपशब्द

अँबर हर्डच्या वकिलाने डेप आणि त्याचा मित्र बारूच यांच्या काही चॅट्स उघड केले होते. यामध्ये जॉनी त्याच्या माजी पत्नी अँबर हर्डबद्दल अपशब्द वापरताना दिसला. अँबर हर्डबद्दल बोलताना तो म्हणाला की मला आशा आहे की अँबर हर्डचे प्रेत होंडा सिलिकच्या ट्रंकमध्ये कुजत असावे. वृत्तानुसार, जॉनीचा मित्र बारूचने कोर्टात कबुली दिली आहे की, जॉनीने हे लिहिलं होतं. तरी तो त्याच्या मित्राचा बचाव करताना दिसला.

आणखी वाचा : शाहरुखचा ‘मॉन्स्टर’ लूक असलेल्या ‘जवान’चा टीझर आला समोर

एम्बर हर्ड आणि कारासोबत एलन मस्कचे थ्रीसम?

या प्रकरणातील सर्वात मोठा धक्कादायक खुलासा एलोन मस्कच्या थ्रीसमबाबत झाला आहे. त्यामुळे एलन मस्कचे नाव पुन्हा एकदा या प्रकरणात ओढले गेले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, २०१६ मध्ये एलन मस्क अँबर हर्डच्या प्रेमात होते आणि तिच्यावर प्रेम करत होते. दोघेही एकत्र वेळ घालवत असत. नंतर अँबर हर्डने देखील एका फोटोद्वारे एलन मस्कसोबतच्या तिच्या नातेसंबंधाची पुष्टी केली. आता पुन्हा एकदा इलॉन मस्कचे नाव चर्चेत आले आहे. जॉनी डेप आणि अँबर हर्ड प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान जारी करण्यात आलेल्या दस्तऐवजांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की एलन मस्कने अँबर हर्ड आणि मॉडेल-अभिनेत्री कारा डेलेव्हिंगने शारीरिक संबंध ठेवले होते. तिने २०१६ मध्ये जॉनी डेप आणि हर्डच्या लॉस एंजेलिस येथील घराममध्ये थ्रीसम केले. त्यावेळी जॉनी डेप शूटिंगच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात होता.