बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल तिच्या एका आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून, हाणामारीच्या दृष्यांदरम्यान तिला सेटवर दुखापत झाली. मागील आठवड्यात एका हाणामारीचे दृष्य साकारत असताना तिच्या गुडघ्याला दुखापत झाली. या विषयी टि्वटरवर पोस्ट केलेल्या संदेशात ती म्हणते, चाहत्यांनो माझ्याबद्दल तुम्ही दाखवलेल्या काळजीसाठी आभार… काही दिवसांपूर्वी मला दुखापत झाली… हाणामारीच्या दृष्यादरम्यान मी अतिशय वाईटरित्या पडले. माझ्या गुडघ्याला दुखापत झाली असून, मी हळूहळू बरी होते आहे. अमिषाला दुखापत झाल्यावर तातडीने डॉक्टरांना सेटवर पाचारण करण्यात आले होते. टि्वटरवरील संदेशात ती म्हणते, डॉक्टरांना बोलावण्यात आले आणि त्यांनी मला इंजेक्शन व औषध दिले. हे सर्व मी तुम्हाला मागील आठवड्यात जेव्हा हे घडले तेव्हा सांगू शकले नाही, यासाठी मला माफ करा. परंतु, यामागे कोणी काळजी करू नये हाच उद्देश होता… याआधी ‘शॉर्टकट रोमिओ’ या चित्रपटात नील नितीन मुकेशबरोबर ती मोठ्या पडद्यावर दिसली होती.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2014 रोजी प्रकाशित
चित्रीकरणादरम्यान अमिषा पटेलला दुखापत
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल तिच्या एका आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून, हाणामारीच्या दृष्यांदरम्यान तिला सेटवर दुखापत झाली.
First published on: 29-01-2014 at 07:32 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ameesha patel gets injured while shooting