बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो पैकी एक म्हणून ओळखला जातो. सध्या सलमान खानच्या बिग बॉसचे १३ वे पर्व सुरु आहे. यंदाचे पर्व आणखी मजेदार करण्यासाठी निर्मात्यांनी अमिशा पटेलला घराची मालकिण केले आहे. तसेच तिला काही अधिकार देखील बहाल करण्यात आले आहेत. परंतु मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करणारी अमिशा ओव्हरअ‍ॅक्टिंग करत असल्याचा आरोप बिग बॉस चाहत्यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेटकऱ्यांनी अभिनेत्री अमिशा पटेलला सोशल मीडियावर ट्रोल करत घरातून तिची हकालपट्टी करावी अशी मागणी बिग बॉस निर्मात्यांकडे केली आहे.

अशा प्रकारचे ट्विट करुन अमिशा पटेलला ट्रोल केले जात आहे.

अमिशा पटेलच्या ओव्हरअॅक्टिंगला सातत्याने होणारा विरोध पाहता आता बिग बॉस निर्माते तिच्या बाबत काय निर्णय घेतील हे नक्कीच पाहण्याजोगे ठरेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ameesha patel overacting bigg boss 13 mppg
First published on: 04-10-2019 at 18:16 IST