बॉलिवूडमधील काही चित्रपट असे आहेत जे प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटली असली तरी प्रेक्षक आजही ते तितक्याच आनंदाने बघतात. या यादीमधला एक चित्रपट म्हणजे ‘गदर: एक प्रेम कथा.’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता जवळपास २० वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणास देखील सुरुवात झाल्याचे समोर आले आहे.

अमिषाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘गदर २’च्या सेटवरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तारा सिंग व सकीना सैनिकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. त्यांच्यासोबतच चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा देखील दिसत आहेत. त्यांचा सेटवरचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे.
Video : …अन् सारा अली खानने मागितली फोटोग्राफरची माफी

‘गदर २’ चित्रपटाची कथा ही ‘गदर’ पेक्षा थोडी वेगळी असणार आहे. या चित्रपटात तारा सिंह पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये जाणार आहे. पण तो सकिनासाठी नाही तर त्यांचा मुलासाठी जाणार आहे. त्यामुळे गदर चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये एक वेगळी कथा पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गदर चित्रपटात तारा सिंहची भूमिका अभिनेता सनी देओलने साकरली होती. तर सकीनाच्या भूमिकेत अभिनेत्री अमिषा पटेल दिसली होती. त्यांच्या मुलाची भूमिका उत्कर्ष शर्माने साकारली होती. आता ‘गदर २’मध्ये हेच कलाकार दिसणार असून चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केल्याचे समोर आले आहे.