प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांची नात आराध्या यांच्यातील आजोबा आणि नातीच्या नात्याबाबत कायमच वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतात. डिसेंबर महिना म्हणजे शालेय स्नेहसंमेलनाचे दिवस. आराध्याच्या शाळेतही वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि अभिनेता अभिषेक बच्चन आपल्या या लाडक्या लेकीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र आराध्याच्या या खास कार्यक्रमाला तिचे लाडके आजोबा अमिताभ बच्चन मात्र उपस्थित राहू शकले नाहीत. आता यामागचे कारण काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असल्याने अमिताभ आराध्याच्या स्नेहसंमेलनाला उपस्थित राहू शकले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या स्नेहसंमेलनात आराध्या एका डान्समध्ये होती. ज्यात तिने लाल रंगाचा फ्रॉक घातला होता. पण दूर असूनही अमिताभ यांना आपल्या या लाडक्या नातीचा परफॉर्मन्स मिस करायचा नव्हता. आता मुंबईबाहेर असल्यावर हा कार्यक्रम कसा अटेंड करायचा हा त्यांचा प्रश्न तंत्रज्ञानामुळे सहज सुटला. अमिताभ यांनी व्हिडियो कॉल करुन आराध्याचा परफॉर्मन्स पाहिला. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा अबराम हाही आराध्याच्याच शाळेत असल्याने या स्नेहसंमेलनाला शाहरुख खान आणि गौरी खान हेही उपस्थित होते. नुकताच आराध्याने ईशा अंबानी हिच्या उदयपूर येथे झालेल्या रिसेप्शनमध्ये दीपिका पदुकोण हिच्यासोबत डान्स केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan did not attend aaradhyas annual day function know why
First published on: 26-12-2018 at 11:34 IST