निवडणुकीचे वातावरण तापत चाललय… काही चित्रपट कलाकारांचाही त्यात सहभाग दिसतोय, अशा वेळेस अशाच एखाद्या सुपर स्टारच्या चक्क उमेदवारीने गाजलेल्या निवडणुकीची आठवण हवीच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही निवडणूक आहे, १९८४ च्या अखेरीस पार पडलेली. तीदेखील लोकसभेची. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या दुर्दैवी निर्घृण हत्येनंतर काँग्रेसच्या वतीने देशभरात एकूण तीन चित्रपट कलाकारांना उमेदवारी देण्यात आली आणि त्या निवडणुकीचा रंगच बदलला. वायव्य मुंबईतून सुनील दत्त, दक्षिण चेन्नईतून वैजयंतीमाला आणि इलाहाबादमधून अमिताभ बच्चन… गांधी कुटुंबाचा मित्र म्हणून अमिताभ या उमेदवारासाठी तयार झाला ही त्यावेळची पहिली बातमी होती. राजीव गांधींच्या मदतीसाठीचे त्याचे हे पाऊल या मुद्दयाने ही चर्चा आणखीन पुढे गेली. चित्रपटसृष्टी, प्रसार माध्यमे व चित्रपट रसिक या तीनही ठिकाणी या सुपर स्टारची ही उमेदवारी गाजू लागली. यावरून स्वाभाविकपणे उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या. कलाकाराने राजकारणात पडावे की नाही हा प्रश्न तेव्हाही गाजला. त्यात अमिताभचा सामना कसलेले राजकारणी समाजवादी पक्षाचे उमेदवार हेमवतीनंदन बहुगुणा यांच्याशी होता. त्यांना हमखास विजय देणारा हा मतदारसंघ. तेथे चित्रपट ताऱ्याचे काय काम हा पहिलाच प्रश्न.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan election campaign
First published on: 20-01-2017 at 01:05 IST