शाहरुखचा चिमुरडा अब्राम आणि बॉलीवूड शहेनशहा अमिताभ यांची नात आराध्या हे दोघे हिंदी चित्रपटसृष्टीतील सध्याचे सर्वात लोकप्रिय स्टार मुलं आहेत. या चिमुरड्यांचा आताच एक मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. त्यामुळे अब्राम आणि आराध्या त्यांच्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मोठेपणी बॉलीवूडमध्ये पदार्पण करतील यात शंका नाही. शाहरुख खानने नुकतच ही दोन्ही मुले भविष्यात एक उत्तम जोडी होऊ शकतात असे म्हटले होते.
दिलवाले च्या प्रसिद्धी दरम्यान शाहरुख-काजोल यांच्यानंतर बॉलीवूडमध्ये अशी केमिस्ट्री कोणत्या जोडीत दिसू शकेल असे शाहरुखला प्रसारमाध्यमांनी विचारले. त्यावर शाहरुखने अजिबात वेळ न दवडता ‘अब्राम-आराध्या’ हे नाव घेतले. ही प्रतिक्रीया ऐकल्यावर आराध्याचे आजोबा म्हणजे दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांनाही आनंद झाला. ‘वझिर’ या चिञपटासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अमिताभ बच्चन यांना शाहरुख खानच्या प्रतिक्रीयेवर विचारले असता ते म्हणाले, ‘तो … ऊनके मुहं ने घी, शक्कर दूध और सब कुछ’ असे म्हटले. त्यामुळे अब्राम-आराध्याच्या जोडीवर बॉलीवूड बादशहानंतर शहेनशहा यांचीही मोहर लागली.
भविष्यात ही चिमुरडी मुले मोठी झाल्यावर कोणत्या क्षेत्राची निवड करतील यावबद्दल आपण काही सांगू शकत नाही. पण निदान त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ शकतो.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jan 2016 रोजी प्रकाशित
अब्राम-आराध्याच्या जोडीवर बॉलीवूड बादशहानंतर शहेनशहाची मोहर!
चिमुरड्यांचा आताच एक मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:

First published on: 04-01-2016 at 11:29 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan on srks comment about abram aaradhya pairing unke mooh main ghee shakar