छोट्या पडद्यावरील माहितीचा स्त्रोत म्हणून ‘कौन बनेगा करोडपती’ या शोकडे पाहिले जाते. ‘कौन बनेगा करोडपती’चा हे १३ पर्व आहे. अमिताभ बच्चन या शोचे सुत्रसंचालन करत आहेत. या शोमध्ये अमिताभ हॉट सीटवर असलेल्या स्पर्धकांसोबत आपल्या आयुष्याच्या अनेक गोष्टी शेअर करतात. यावेळी तर कौन बनेगा करोडपतीमध्ये विचारलेल्या प्रश्नावरून अमिताभ यांनी त्यांच्या नावामागची कहाणी सांगितली आहे.

यावेळी हॉट सीटवर बसलेल्या दीप्ती तुपे यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न होता ‘कला और बूढ़ा चांद’, ‘तारापथ’ और ‘चिदंबरा’ या तीन कविता कोणत्या कवींनी लिहिल्या आहेत?
A) सुमित्रानंदन पंत
B) मोहन राकेश
C) धर्मवीर भारती
D) मैथिली शरण गुप्त

आणखी वाचा : नागा चैतन्य आणि साई पल्लवीच्या ‘लव्ह स्टोरी’ वर समांथा म्हणाली…

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी दीप्ती यांनी लाईफलाइन वापरली. या प्रश्नाचे उत्तर होते श्री. सुमित्रानंदन पंत होते. त्यानंतर अमिताभ यांनी त्यांच्या नावा मागची कहाणी सांगितली. बिग बींनी खुलासा केला की ‘१९४२ मध्ये त्यांची आई आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यावेळी त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या मिरवणुकीत भाग घेतला. जेव्हा कुटुंबातील माणसांना या विषयी कळाले की त्या घरी नाही आणि मिरवणुकीत भाग घेण्यासाठी गेल्या आहेत, तेव्हा घरच्यांना राग आला आणि त्यांनी अमिताभ यांच्या आईला घरी नेले. त्यावेळी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या भाग असलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या आईला सुचवले की तुमच्या मुलाचे नाव ‘इन्क्लाब’ ठेवा. त्यानंतर अमिताभ यांच्या वडिलांचे जवळचे मित्र सुमितानंदन पंत हे अमिताभ यांच्या नामकरण समारंभासाठी घरी आले होते. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि मला अमिताभ नाव दिले, असे अमिताभ यांनी सांगितले.

आणखी वाचा : नमुन दत्तानंतर ‘तारक मेहता..’ फेम राजने सोशल मीडियावरुन रिलेशनशिपबद्दल केलं भाष्य

सुमित्रानंदन पंत हे २० व्या शतकातील सुप्रसिद्ध कवींपैकी एक होते. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. २८ डिसेंबर १९७७ रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद आजच्या प्रयागराजमध्ये सुमितानंदन यांचे निधन झाले.