इमरान हाशमीच्या मुलाला बिग बींनी पाठवले लेखी पत्र

सहा वर्षीय अयानच्या कॅन्सरवरील उपचारादरम्यानचे अनुभव आणि प्रसंग

Emraan Hasmis son ayaan, Amitabh bachchanअभिनेता इमरान हाशमी, मेगास्टार अमिताभ बच्चन

अभिनेता इमरान हाशमी याचे ‘द किस ऑफ लाईफ: हाऊ अ सुपरहिरो अँड माय सन डिफिटेड कॅन्सर’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. या पुस्तकात इमरानने त्याचा सहा वर्षांचा मुलगा अयान याच्या कॅन्सरवरील उपचारादरम्यानचे अनुभव आणि प्रसंग कथन केले आहेत.
‘किस ऑफ लाइफ’ या पुस्तकाची बॉलीवूडकरांनी बरीच प्रशंसा केली आहे. त्यासाठी अयानने स्वतःच्या हाताने Thank You लिहलेले नोट सर्वांना पाठविले होते. हे पुस्तक वाचण्याचा मोह खुद्द मेगास्टार अमिताभ बच्चन यांनाही आवरला नाही. बिग बींनी हे पुस्तक वाचल्यानंतर स्वतः अयानसाठी एक पत्र लिहून पाठवले. हे पत्र इमरानने ट्विट केले असून त्याने म्हटले की, या पत्रासाठी मी तुमचा आभारी आहे. अयानला बॅटमन व्हावेसे वाटते आणि बॅटमनला तुमच्यासारखे व्हावेसे वाटते. तुम्ही खरे सुपरहिरो आहात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amitabh bachchan sends a hand written note to emraan hashmis son ayaan

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या