सरबजीतवरील चित्रपटाला अमिताभ यांचा बाय बाय!

बॉलीवूड दिग्दर्शक सुभाष घई हे दिवंगत भारतीय कैदी सरबजीत याच्यावर चित्रपट बनवत आहेत.

बॉलीवूड दिग्दर्शक सुभाष घई हे दिवंगत भारतीय कैदी सरबजीत याच्यावर चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटातील पाकिस्तानी वकिलाच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्यांनी ही भूमिका साकारण्यास नकार दिला असल्याचे सुभाष घई यांनी सांगितले आहे.
घई म्हणाले की, सरबजीतची भूमिकेसाठी मी नव्या कलाकाराचा शोध घेत आहे. अमिताभ हे दुस-या चित्रपटासाठी वचनबद्ध आहेत. त्यांनी चित्रपटाची कथा वाचली आणि ते एका चित्रपटात वकिलाची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले. याच कारणामुळे त्यांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिला असे घई म्हणाले.
लाहोर येथील कोटलखपत तुरुंगात शिक्षा भोगणारा भारतीय कैदी सरबजीतचे याच वर्षी निधन झाले. तुरुंगातील इतर कैद्यांनी त्याला तुरुंगात मारहाण केली होती. यात तो अतिशय वाईटरित्या जखमी झाला आणि अखेर त्याचा मृत्यू झाला. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amitabh bachchan to play pakistani character in resul pookuttys film

ताज्या बातम्या