बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन नेहमीच सोशल नेटवर्किंग साईटवर सक्रिय असतात. त्याचप्रमाणे त्यांची नात ‘नव्या नवेली’ सुद्धा फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर आपली वेगवेगळी छायाचित्र प्रसिद्ध करत असते. यावेळी सुद्धा नव्याने भारत वि. न्यूझीलंड सामन्याचे ट्विट केले होते. या गोष्टीचे अमिताभ बच्चन यांनी अभिमानाने उघडपणे कौतुकही केलेले. मात्र, नंतर अमिताभ बच्चन यांना स्वतःची चूक समजली.
झाले असे की, नव्या नवेली या नावाने एक बोगस ट्विटर अकाउन्ट तयार करण्यात आले आहे. त्यावरूनच सदर ट्विट करण्यात आले होते. आपल्या नातीने क्रिकेटसंबंधी ट्विट केल्याचे पाहून अमिताभ यांनी त्याची प्रशंसा केली होती. मात्र, काही वेळातच आपली नात ट्विटरवर नसल्याचे बिग बींना कळले. माझी नात नव्या नवेली ही ट्विटवर नाही आहे. ते अकाउन्ट बोगस होते. त्या ट्विटवर मी चुकून प्रतिक्रिया दिली, असे ट्विट अमिताभ यांनी केलेयं.
संग्रहित लेख, दिनांक 18th Mar 2016 रोजी प्रकाशित
अमिताभ बच्चन यांना उमगली स्वतःची चूक
त्या ट्विटवर मी चुकून प्रतिक्रिया दिली
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 18-03-2016 at 14:00 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan warns people against granddaughter navya navelis fake twitter account