बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आता जवळ आला आहे. ११ ऑक्टोबरला या दिग्गज अभिनेत्याचा ७५ वा वाढदिवस आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्यासाठी त्यांचे चाहते काही ना काही वेगळं करण्याचा नक्कीच विचार करत असतील. मात्र, यंदा त्यांच्या चाहत्यांची निराशा होणार आहे. कारण, बिग बी त्यांचा ७५ वा वाढदिवस आणि दिवाळी यावेळी साजरी करणार नाहीत.

वाचा : PHOTOS ‘काहे दिया परदेस’ फेम सायलीचा बोल्ड लूक

अमिताभ यांनी स्वतः ते वाढदिवस आणि दिवाळी साजरी करणार नसल्याचे सांगितले. पण यामागे नेमके काय कारण आहे, याचा उलगडा त्यांनी केलेला नाही. त्यांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचे वडील कृष्णराज राय यांचे मार्च महिन्यात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. कदाचित यामुळेच बिग बींनी कोणताही आनंद साजरा न करण्याचे ठरवल्याचे दिसते.

वाचा : PHOTOS ‘केदारनाथ’मधील सारा अली खानची पहिली झलक

अमिताभ बच्चन यांनी नुकेतच ट्विट केले की, ‘भारतीय संघाने टी-२० मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. कबड्डीमध्ये पिंक पँथर्सचा विजय, थंडरस्टॉर्मचे चित्रीकरण रद्द आणि ट्विटरवर माझे तीन कोटी फॉलोअर्स पूर्ण झालेत’ असे विविध प्रकारचे वृत्त देणारे ट्विट करत त्यांनी ७५ वा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे सांगितले. ‘होय, यंदा माझा ७५ वा वाढदिवस आहे. पण वाढदिवस आणि दिवाळीचे कोणत्याही प्रकारे सेलिब्रेशन करणार नाही’, असे म्हणत त्यांनी पुढे ‘अरे छोड़ दो यार ! बस सांस लेने दो !’ असेही लिहिलंय.

दरम्यान, ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या आगामी बहुप्रतिक्षित चित्रपटात अमिताभ हे आपल्याला मि. परफेक्शनिस्ट आमिर खान याच्यासोबत काम करताना दिसतील. हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज अभिनेते पहिल्यांदाच या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर एकत्र पाहावयास मिळणार आहेत. यशराज फिल्म्सची निर्मिती असलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य करतोय.