चित्रपट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि निर्माते अमेय खोपकर यांनी मराठी सेलिब्रिटींचा एका भन्नाट व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. ‘मराठी सेलिब्रिटी अॅकापेला’ असं या व्हिडिओचं शीर्षक आहे. अॅकापेला प्रकारातील या व्हिडिओत ६६ कलाकार आणि ४३ गाण्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अमेय खोपकरांना या व्हिडिओसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाद्यांचा आवाज तोंडाने काढून गाणं गाण्याची ही कला म्हणजे ‘अॅकापेला’. एव्हीके एंटरटेन्मेंट निर्मित या अनोख्या कलेच्या व्हिडिओत मराठीतील नवोदित कलाकारांपासून दिग्गजांपर्यंत अनेकांना पाहायला मिळत आहेत. अभिजीत पानसे, अभिनय देव, भरत जाधव, किशोरी शहाणे, महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, मानसी नाईक, मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर, सचिन पिळगावकर, संजय जाधव, सोनील खरे, स्वप्नील जोशी, विनोद कांबळी, विक्रम फडणीस ही अनोखी कला सादर करताना दिसत आहेत.

वाचा : ‘कमाईच्या अर्ध्याहून अधिक मनोरंजन कर घेता तर किमान आमच्या कलेचा सन्मान तरी करा’  

बिग बींनी ट्विटरच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan wishes luck to ameya khopkar for marathi acapella having 66 artistes and 43 songs
First published on: 04-05-2018 at 15:05 IST