शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज वयाच्या १०० व्या वर्षी पुण्यामध्ये निधन झालं. १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रशासनाने दिली आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाच्या वृत्तानंतर सर्वच स्तरांमधून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अनेक मालिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते अमोल कोल्हे यांनीही बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनानंतर त्यांना एका कार्यक्रमादरम्यानच श्रद्धांजली अर्पण केलीय.

नक्की पाहा >> Video: १०० व्या वाढदिवशी बाबासाहेब पुरंदरे म्हणालेले, “आयुष्याची आणखी २-३ वर्षे मिळाली तर एवढीच इच्छा आहे की…”

Gurucharan Singh missing
गुरुचरण सिंगने बेपत्ता होण्यापूर्वी पाठवलेला ‘हा’ मेसेज, प्रसिद्ध निर्मात्याने दिली माहिती; म्हणाले, “भक्ती त्याला आणायला…”
vidya balan smoking
“मला धूम्रपान करायला खूप आवडतं”, विद्या बालनचा खुलासा; म्हणाली, “‘द डर्टी पिक्चर’नंतर…”
will Salman Khan relocate from Galaxy apartment
गोळीबारामुळे सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? अरबाज खान म्हणाला, “नवीन ठिकाणी राहायला…”
suniel shetty and karisma kapoor dance on famous bollywood songs
Video : झांझरिया…२८ वर्षांनी सुनील शेट्टी-करिश्मा कपूरचा पुन्हा एकदा जबरदस्त डान्स, माधुरी दीक्षितने मारल्या शिट्ट्या

आज सोनी मराठीवरील ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेच्या प्रदर्शनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना अमोल कोल्हेंनी बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली. “वयाच्या १०० व्या वर्षी बाबासाहेब पुरंदरेंचं निधन झाल्याची बातमी काही पोर्टल्सच्या माध्यमातून आली. सर्व प्रथम त्यांच्या प्रती श्रद्धांजली अर्पण करतो. आपला जाज्वल्य इतिहास अभिमानास्पद इतिहास जनतेसमोर मांडण्याचं काम त्यांनी केलं. माझ्या पिढीला जी गोष्ट दिसली त्यामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं नाव अग्रक्रमानं घेणं हे आगत्याचं ठरेल. मी त्यांच्या प्रती व्यक्त केलेली एक कृतज्ञता ठरेल,” असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन : गडकरी हळहळले तर नारायण राणे म्हणाले, “ही महाराष्ट्राची खूप मोठी हानी”

मोदींनीही वाहिली श्रद्धांजली….
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाच्या वृत्तानंतर श्रद्धांजली अर्पण केलीय. बाबासाहेबांच्या निधनामुळे कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाल्याचं मोदींनी म्हटलं आहे. “शब्दांमध्ये मांडता येणार नाही असं दु:ख मला झालं आहे. बाबासाहेब पुरंदरेच्या निधनामुळे इतिहास आणि संस्कृतिक क्षेत्रामध्ये कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झालीय. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भविष्यातील पिढ्या छत्रपती शिवाजी महारांजांशी जोडलेल्या राहतील. त्यांनी केलेलं इतर कामही कायमच स्मरणात राहील,” असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.