बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांची पत्नी संध्या गोखले यांनी सनी लिओनीला पत्र लिहिले आहे. काही दिवसांपूर्वीची सनी लिओनीची टिव्ही चॅनलवरीची एक मुलाखत चांगलीच गाजली होती. मुलाखतीत सनीला काही बोचरे प्रश्न विचारण्यात आले होते. यानंतर सनीला टिकेस सामोरे जावे लागले होते. याच मुलाखतीचा धागा पकडून संध्याने सनीला हे पत्र लिहीले आहे. हा सर्व प्रकार सनीने योग्यप्रकारे हाताळल्याने संध्याने तिचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर भविष्यात अशा प्रसंगांना सामोरे जाताना उपयोगी पडतील अशा काही टिप्सदेखील संध्याने तिला दिल्या आहेत.
या पत्रातील एका भागात संध्या लिहितात, “टिव्हीवरील मुलाखतीदरम्यान तुला अडचणीत आणण्याचा मुलाखतकर्त्याचा प्रयत्न तू हाणून पाडल्याने न राहून मी तुला हे पत्र लिहीत आहे. तुझ्या भूतकाळाबद्दल तुला पश्चाताप वाटतो का? मुलाखतकर्त्याने तुला विचारलेल्या या पहिल्या प्रश्नातूनच फक्त टिआरपी मिळविणे हाच त्याचा एकमेव उद्देश असल्याचे स्पष्ट होते. मुलाखतीदरम्यान तू अँड्रिया ड्वोरकिन आणि कॅथरिना मॅक्निोन यांचा नामोल्लेख करायला हवा होता. जर आम्ही महिला ‘माझे शरीर, माझी मर्जी’वर विश्वास ठेवतो, तर मर्यादीत स्वरुपातील ‘पॉर्नोग्राफी’ का करू शकत नाही, असा प्रश्न आमिरशिवाय दुसऱ्या कोणाचे नाव न घेऊ शकलेल्या मुलाखतकर्त्याला तू विचारायला हवा होतास.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol palekars wife writes a letter to sunny leone
First published on: 12-02-2016 at 15:12 IST